मुस्लीम पत्नीसाठी हिंदू अभिनेता करतोय रोजा; इस्लामबद्दल म्हणाला “खूप कठीण..”
स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत मनीष गोयंकाची भूमिका साकारून अभिनेता सचिन त्यागी घराघरात पोहोचला. सचिन आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने दोन लग्न केले आहेत. पहिल्या लग्नातून त्याला दोन मुली आहेत, तर दुसऱ्या लग्नातून त्याला एक मुलगी आहे. सचिनच्या पत्नीचं नाव रक्षंदा खान आहे. रक्षंदासुद्धा टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सचिन हिंदू असून रक्षंदा मुस्लीम आहे. सध्या रमजानचा महिना सुरू असून रक्षंदा दररोज रोजा करतेय. तिच्यासोबत सचिनसुद्धा रोजाचा उपवास करतोय. याविषयी आणि इस्लाम धर्माविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.
‘टेली मसाला’शी बोलताना सचिन म्हणाला, “मला आधी खूप आश्चर्य वाटायचं की तीस दिवसांपर्यंत कोणी कसा उपवास करू शकतो? आता तर माझ्या घरातच हा उपवास होतो. त्यांना पाहून मलाही उपवास करायची इच्छा झाली. प्रेम आणि विश्वासाने केलं तर सर्वकाही शक्य होतं. जो अकीदा आहे, त्याबद्दल असं म्हटलं जातं की अकीदा असेल तर माणूस पाण्यावरही जगू शकतो. मग हे तर फक्त पाण्याविना 12-13 तास राहायचं आहे. खूप कठीण आहे. खूप जास्त कठीण आहे. परंतु जिथे विश्वास असतो, तिथे पर्वताला तोडूनही रस्ते बनवले गेले आहेत. हा तर फक्त उपवासाचा प्रश्न आहे.”
पत्नी रक्षंदा आणि इस्लामबद्दल बोलताना सचिनने पुढे सांगितलं, “जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा मला जाणून घ्यायचं होतं की इस्लाम काय असतं. मी हदीस वाचलं होतं. त्यातील 3000 पॉईंट्सपैकी मी भाषांतरित केलेले 1200 ते 1400 पॉईंट्स वाचण्याचा प्रयत्न केला. ते सर्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. मला इतरांचं माहीत नाही पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढत आहे. सर्वजण हेच म्हणतात की देव एकच आहे. तो देव तुम्हाला मन पवित्र केल्यावर, चांगली व्यक्त बनल्यावर भेटेल, असंच त्यात लिहिलंय. त्यामुळे मला काही फरक जाणवला नाही. सर्व धर्मात तेच सांगितलं गेलंय.”
रक्षंदा खानने छोट्या पडद्यावर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. तिचं नाव साजिद खानशीही जोडलं गेलं होतं. हे दोघं जवळपास दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर रक्षंदाने सचिनशी लग्न केलं. रक्षंदा गरोदर असताना साजिदची बहीण फराह खानने तिच्यासाठी बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं. रक्षंदाने ‘कसम से’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘नागिन 3’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List