आमिर खानने नव्या गर्लफ्रेंडच्या सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय, म्हणाला, ‘लपवायचं नाही, पण काही मर्यादा…’
बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींचं लग्न आणि घटस्फोट देखील आता सामान्य गोष्ट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आमिर खान याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण अभिनेत्याने रंगणाऱ्या चर्चांवर मौन बाळगलं होतं. अखेर वाढदिवसाच्या एक दिवस आधी अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे अभिनेता तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली आहे. आमिर खान याच्या आयुष्यात गौरी स्प्रॅक नावाच्या एका महिलेची एन्ट्री झाली आहे.
गर्लफ्रेंड म्हणून गौरीची ओळख करण्यापूर्वी आमिर खान याने तिला काही गोष्टींसाठी तयार केलं आहे. आमिर खान याची गर्लफ्रेंड असल्यामुळे सतत चर्चेत राहणार, शिवाय भोवती लोकांची गर्दी जमेल. म्हणून अभिनेत्याने गौरी हिच्यासाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवला आहे.
अभिनेता म्हणाला, ‘आम्ही एकमेकांची साथ आवडली आहे. आम्ही एकमेकांना 18 महिन्यांचा वेळ दिला आणि त्यानंतर सर्वांसमोर नात्याची कबुली दिली. आता मला काहीही लपवण्याची गरज नाही. पण यासर्व गोष्टींसाठी मी काही मर्यादा ठेवल्या आहेत… कारण गौरीला लाइमलाइटची सवय नाही…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘गौरीसाठी मी पर्सनल बॉडीगार्ड ठेवला आहे. हे मी फक्त माझ्या शांतीसाठी केलं आहे.’ सध्या सर्वत्र आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण कार्यक्रमादरम्यान अभिनेत्याने गौरी फोटो आणि व्हिडीओ काढण्यास नकार दिला.
आमिर खानने सांगितले की, दोघेही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत असले तरी ते गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. आमिर खान याने त्याच्या कुटुंबात प्रचंड चांगल्या प्रकारे स्वागत केलं… असं देखील गौरी म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List