इस मोहतरमा के साथ जहीर होली नही खेल सकता; ट्रोल करणाऱ्याला सोनाक्षीचे सडेतोड उत्तर
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही महिन्यांपूर्वीच लग्न बंधनात अडकली आहे. ती लग्नानंतरचे सण धुमधडाक्यात साजरे करताना दिसते. नुकताच तिने होळी हा सण देखील साजरा केला आहे. पण हा सण तिने एकटीने साजरा केला असल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सोनाक्षीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील दिले आहे.
सोनाक्षीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाक्षीने पांढऱ्या रंगाचे ड्रेस घातला आहे. तसेच मोकळे केस, हाताला गुलाबी रंग लावून सोनाक्षी दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List