“तुझं अंतर्वस्त्र दिसू दे, दिग्दर्शक चारवेळा म्हणाला”, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना आतापर्यंत बरेच कास्टिंग काऊचचे अनुभव आले आहेत. काही अभिनेत्रींनी उघडपणे यावर वक्तव्य करत निर्मात्यांच्या लाजिरवाण्या मागण्यांचा पर्दाफाशही केला होता. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडे देखील दिग्दर्शकाने लाजीरवाणी मागणी केली होती. त्यानंतर तिने शपथ घेतली की ती त्या दिग्दर्शकासोबत कधीही काम करणार नाही.
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची देसी गर्ल, प्रियांका चोप्रा आहे. हॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या प्रियांकाने हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे.
एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान, दिग्दर्शकाने प्रियांकाच्या स्टायलिस्टला सांगितले होते की, गाण्यात तिची अंतर्वस्त्रे दिसली पाहिजेत. तेव्हा प्रियांका केवळ १९ वर्षांची होती.
प्रियांकाने फोर्ब्स वुमेन्स समिट दरम्यान दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी उघड केली होती. 'चित्रपटात एक गाणे होते ज्यात मी एस्कॉर्टची भूमिका केली होती कारण सुंदर मुली हेच करतात. मी खूप उत्साहित होते कारण एका मोठ्या भारतीय अभिनेत्यासोबतचा हा माझा पहिला चित्रपट होता' असे प्रियांका म्हणाली होती.
पुढे ती म्हणाली, 'मला ते गाणे अजूही आठवते. तो गाण्यासाठी मला माझ्या स्टायलिस्टशी बोल असे म्हणाला होता. तो त्याच्या खुर्चीवर बसला होता आणि मी त्याच्या मागे उभी होते. त्याने फोन उचलला आणि म्हणाला की, जेव्हा ती तिचे अंतर्वस्त्र दाखवेल तेव्हा लोक तिला बघायला सिनेमगृहात येतील. तिची अंतर्वस्त्र दिसावीत असे तो चार वेळा फोनवर म्हणाला.'
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List