Maharashtra Legislative Council Election : भाजपच्या उमेदवारांची नावं ठरली, माधव भंडारींचा पत्ता पुन्हा कट

Maharashtra Legislative Council Election : भाजपच्या उमेदवारांची नावं ठरली, माधव भंडारींचा पत्ता पुन्हा कट

राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून रविवारी भाजपने त्यांच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी या तिघांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचा पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे.

भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली होती. या यादीत माधव भंडारी अमरनाथ राजूरकर यांच्या सोबत दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांची देखील नावे होती. मात्र दिल्लीवरून शिक्कामोर्तब होऊन आलेल्या नावांमध्ये माधव भंडारी अमरनाथ राजूरकर यांचे नाव नसून दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे विधान परिषद सदस्य असणारे प्रवीण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर तर शिंदे गटाचे आमश्या पडवी आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे पाच सदस्य विधानसभेत निवडून आले आहेत. यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन तर शिंदे गट व अजित पवार गटाच्या वाटेला प्रत्येकी एक जागा आली आहे.

अजित पवार गटात अनेक इच्छुक

अजित पवार गटाच्या वाटय़ाला एक जागा आलेली आहे, मात्र या एका जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. माजी खासदार आनंद परांजपे, सुबोध महिते, सुनील टिंगरे, दीपक मानकर, नाना काटे आदी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे.

शिंदे गटाकडून कोण?

शिंदे गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांचे जोरदार लॉबिंग सुरू आहे. एकच जागा असल्याने कुणाला संधी द्यायची हा प्रश्न आहे. कॉँग्रेसची साथ सोडून सोमवारीच शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वादग्रस्त विधान भोवलं, उत्तराखंडच्या अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण वादग्रस्त विधान भोवलं, उत्तराखंडच्या अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
उत्तराखंडचे अर्थ आणि संसदीय कामकाज मंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य...
पाण्यात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी गेले अन् बुडाले, एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी मृत्यू
बीडमधील दहशतवाद कधी थांबणार? जिल्ह्यातील सगळे अधिकारी बदलून टाका; अंजली दमानिया यांची मागणी
Beed News – बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती, ट्रकचालकाला डांबून ठेवले; मग अमानुष छळ करत हत्या
आता नो लेट मार्क, बदलापूर – कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्ताराला मंजूरी
मोठी बातमी! अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; दोन बडे नेते गळाला, मोठा धक्का
सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवर हिरवी चादर चढविली, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट, अखेर….