550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
प्रीती झिंटाच्या 'संघर्ष' चित्रपटातून 1999 मध्ये या मुलीने बालकलाकार म्हणून पदार्पण केले. यामध्ये प्रीती झिंटासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाद्वारे आज चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या या तरुणीने पदार्पण केले. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला होता.
'संघर्ष'मधील ही मुलगी म्हणजे आलिया भट्ट आहे. त्या चित्रपटातील आलियाच्या निरागसतेने लोकांना इतके प्रभावित केले की ते या मुलीचे चाहते झाले. यानंतर आलियाने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून डेब्यू केला. पहिल्याच चित्रपटापासून आलियाची लोकप्रियता खूप वाढली.
बॉलीवूडमध्ये आलियाने कधीच मागे वळून पाहिले नाही. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी आलिया आज 550 कोटींची मालक आहे. तसेच एका चित्रपटासाठी ती सुमारे 15 कोटी रुपये मानधन घेते. टॉप अभिनेत्री आणि करोडोंची मालकीण असण्यासोबतच आलिया अनेक ब्रँड्सची जाहिरात करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List