सहावीत नापास; यूपीएससी पहिल्या प्रयत्नात पास
आयुष्यात अपयश झाले तरी जीवनाचा मार्ग कधी बंद होत नसतो. उलट संघर्षालाच जीवन असे म्हणतात. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सनदी अधिकारी रुक्मिणी रियार यांचा जीवनप्रवास असाच आहे, अतिशय प्रेरणादायी. त्या सहावीत नापास झाल्या होत्या. मात्र तरीही खचून न जाता यूपीएससी पहिल्या प्रयत्नात पास झाल्या. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
रुक्मिणी रियार यांचा शैक्षणिक प्रवास आव्हानांनी भरलेला राहिला. सहावीत नापास झाल्याने त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटली. त्यांना शैक्षणिक संघर्ष करावा लागला. तरीही घाबरून न जाता भीतीचे शक्तीत रूपांतर केले. कमी गुणांचा सामना करत त्यांनी गुरुदासपूर आणि डलहौसी येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रात्रंदिवस अभ्यास करून रुक्मिणी यांनी अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठातून सामाजिक शास्त्राची पदवी मिळवली. मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूटमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. सुवर्णपदकही मिळवले. शिक्षण पूर्ण करताना एनजीओsंसोबत काम केले. त्यावेळी त्यांनी यूपीएससी परीक्षा द्यायची इच्छा झाली. यूपीएससी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. देशभरात दुसरा क्रमांक मिळवला. कोणताही कोचिंग क्लास न लावता त्यांनी हे यश मिळवले. एनसीईआरटीचे पुस्तके, नियमित वर्तमानपत्र-मासिकांचे वाचन करून यश मिळवले. याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List