सोनू निगमच्या मुलाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फिटनेस पाहून टायगर श्रॉफसुद्धा भारावला
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली आहेत. सोनूप्रमाणेच त्याचा मुलगा निवान निगमसुद्धा उत्तम गायक आहे. लहानपणापासूनच निवानने त्याच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत गाणी गायली आहेत.
नुकतंच सोनू निगमने सोशल मीडियावर त्याच्या मुलाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. निवान केवळ गायनातच निपुण नाही तर त्याने त्याच्या तंदुरुस्तीवरही काम केलंय.
निवानने त्याच्या इन्स्टाग्रामवर ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. हेच फोटो शेअर करत सोनू निगमने अभिमान व्यक्त केला आहे. निवानने त्याचं वजन नियंत्रणात आणलं असून शरीरयष्टीकडेही पूर्ण लक्ष दिलं आहे.
निहानचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. एकेकाळी गुबगुबीत दिसणाऱ्या निवानने आता त्याचे सिक्स पॅक अॅब्स फ्लाँट केले आहेत. इन्स्टाग्रामवरील त्याची ही पहिलीच पोस्ट असून सोशल मीडियावर ती चांगलीच व्हायरल झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List