आता मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक होणार
निवडणूक आयोग आता मतदान कार्ड आधारकार्डसोबत लिंक करण्याची तयारी करत आहे. निवडणुकीतील पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने, मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची प्रक्रिया आता जलद करण्यात येणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पुढील आठवडय़ात होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी 18 मार्च रोजी पेंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, विधिमंडळ विभागाचे सचिव राजीव मणी आणि यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार बैठकीत सहभागी होतील. काही दिवसापूर्वी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये मतदारांचा ईपीआयसी क्रमांक समान असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर आता ही बैठक होत आहे.
2021 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये सुधारणा केल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यास सुरुवात केली. निवडणूक आयोगाने अद्याप आधार आणि मतदार ओळखपत्र डेटाबेस लिंक केलेले नाहीत.
ज्या मतदारांना डुप्लिकेट ईपीआयसी नंबर दिला आहे त्यांना एक नंबर दिला जाणार आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते. समान ईपीआयसी क्रमांक असल्याने मतदार बनावट आहेत असा अर्थ होत नाही, परंतु मतदार फक्त ज्या मतदारसंघात नोंदणीकृत आहे तिथेच मतदान करू शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List