‘आताचे नेतेही कार्यकर्त्यांसोबत नाचतात, तर…’, ‘छावा’ सिनेमातील लेझीम सीनवर संतोषचं वक्तव्य, ‘त्या’ सीनचं वास्तव अखेर समोर
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. सिनेमाने जगभरात 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृह हाऊसफुल झाली. पण ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मात्र लेझीम सीनवरून वातावरण तापलं होतं. आता लेझीम सीन कसा शूट करण्यात आला आणि त्यासाठी किती दिवस लागते याबद्दल अभिनेता संतोष जुवेकर याने मोठा खुलासा केला आहे. लेझीम सीनबद्दल सांगताना अभिनेत्रीने आताच्या नेत्यांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
संतोष जुवेकर म्हणाला, बुऱ्हाणपूरची लढाई झाल्यावर महाराज सैन्य आणि सहकाऱ्यांसोबत पुन्हा रायगडावर येतात. तेव्हा महाराजांचं औक्षण केलं जातं. येसुबाई, धाराऊ महाराजांना ओवाळतात आणि रयतेकडून राजांचं स्वागत केलं जातं. त्या आनंदोत्सवाचं ते गाणं आहे आणि त्या गाण्यात लेझीम आहे. लेझीम आपला पारंपरिक खेळ आहे. ढोल, ताशे लेझीम खेळले जात आहेत. तिथे महाराज उभे असतात. तेव्हा एक दोन मावळे महाराजांकडे येतात आणि त्यांच्यापुढे लेझीम धरतात… मावळे महाराजांना लेझील खेळाण्यासाठी आग्रह करतात. तेव्हा महाराज येसुबाईंकडे पाहातात. तेव्हा येसुबाई आणि धाराऊ देखील हसत त्यांना खेळायला सांगतात…
त्यानंतर महाराज लेझीम घेऊन तीन – चार डाव खेळतात. ते गाणं आम्ही 4 – 5 दिवस शूट केलं होतं. पहिल्या दिवशी जे आमचे नृत्यदिग्दर्शक होते त्यांनी लक्ष्मण सरांनी स्पष्ट सांगितलं होतं, मला फक्त लेझीम हवा आहे ‘मुझे सिर्फ लेझीम चाहिए. कोई स्टेप या डान्स नही! मुझे डान्स नही शेर चाहिए… लेझीम खेळताना देखील मला आनंद हा वाघाचा आनंद वाटला पाहिजे… तिथे कुठेच मला हिरो नकोय…’
संतोष पुढे म्हणाला, ‘इतकं सुंदर गाणं होतं. आधी कोणीतरी ते गाणं पाहिलं असतं तर ते गाणं आज सिनेमात असतं… एखाद्या छोट्या क्लीपवरून महाराज असे नाचू कसे शकतात? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता आपण पाहतो की अनेक पक्षांचे नेते निवडून येतात. तेव्हा त्यांचे कार्यकर्ते ढोल – ताशे घेऊन जल्लोष करत नाचतात. तेव्हा कार्यकर्ते त्यांच्या नेत्याला बोलावतात. कार्यकर्त्यांसोबत नेतेही नाचतात. मग माझे राजे दोन डाव खेळले असतील ना…’ असं देखील संतोष जुवेकर म्हणाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List