तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. उन्हाळ्यामध्ये तुमचं शरीर डिहायड्रेट होऊ शकते ज्यामुळे चक्कर येणे शरीरामध्ये थकवा जाणवणे यांच्या सारख्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या शरीरात पाण्याची मात्रा संतुलित राहाणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिणे फायद्याचे ठरते. तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण जेवणाच्या तुलनेमध्ये जास्त ठेवा. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये फळांचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या साखर मिळण्यास मदत होईल. तुमच्या शरीरामध्ये फळं खाल्ल्यामुळे साखरेचे आणि पाण्याचे प्रमाण संतुलित राहाण्यास मदत होईल.
उन्हाळा सुरू होताच बाजारात विविध प्रकारचे फळं पाहायला मिळतात. फळांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात जेवणापेक्षा फळांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरगी राहाण्यास मदत होईल. तज्ञांच्या मते, कलिंगडाचे सेवन तुमच्या आरोग्याससाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कलिंगडाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेशन मिळण्यास मदत होते. कलिंगडामध्ये 92% पाणी असते ज्यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड राहाते.
कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, ए आणि बी६ असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकशक्ती वाढते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाही. कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅनिन सी असते ज्यामुळे त्याचे सेवन तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराले उर्जा मिळते ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश फिल करता. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिम असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते. कलिंगडाचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि अमीनो अॅसिडसारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. याव्यतिरिक्त तुमच्या शरीरातील सर्व हार्मोन्स संतुलित राहिल्यामुळे तुमच्या शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. कलिंगडमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करून पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. यामध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम देते. कमी कॅलरीज आणि चरबीमुक्त असल्याने, वजन कमी करण्यासाठी देखील हे एक उत्तम फळ आहे. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की हे फळ कोणत्या वेळी खाऊ नये. चला जाणून घेऊया.
तज्ञांच्या, जड अन्न खाल्ल्यानंतर लगेच कलिंगड खाणे हानिकारक ठरू शकते. यामुळे पचन प्रक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. म्हणून, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही कधीही कलिंगड आणि अन्न एकत्र खाऊ नये. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यात कलिंगड खाऊ शकता. तथापि, जर तुम्ही जेवणाच्या वेळी कलिंगड खात असाल तर तुम्ही जेवण वगळू शकता.
या लोकांनी कलिंगड खाऊ नये
ज्या लोकांना सर्दी किंवा घसा खवखवण्याची समस्या आहे त्यांनी कलिंगड खाणे टाळावे. त्याच्या थंड स्वभावामुळे घशातील अस्वस्थता आणखी वाढू शकते आणि बरे होण्यास विलंब होऊ शकतो. याशिवाय, जेव्हा जेव्हा हवामान बदलत असेल तेव्हा तुम्ही कलिंगड खाणे टाळावे. कलिंगड नेहमी सामान्य तापमानातच खावे. ते थंड खाणे टाळा.कलिंगड आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे महत्वाचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List