सैफ अली खानवर उपचार झालेल्या रुग्णालयात सापडला हाडांनी भरलेला कलश, रुग्णालय म्हणजे काळ्या जादूचा बालेकिल्ला?
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरावर 16 जानेवारी 2025 मध्ये हल्ला झाला. अचानक एक व्यक्ती अभिनेत्याच्या घरात घुसला. मुलांना आणि घरातील महिलांना वाचवण्यासाठी सैफ अली खान आणि हल्लेखोरामध्ये हाणामारी झाली. तेव्हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेव्हा अभिनेत्याला रात्र तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं, त्या रुग्णालयाबाबत धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. रुग्णालयात काळी जादू होत असल्याची माहिती समोर येत आहे. लिलावती रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं होतं.
लिलावती रुग्णालयाचे ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी दावा केला की, माजी ट्रस्टींनी रुग्णालय परिसरात नव्या ट्रस्टी बोर्ड विरोधात काळी जादू केली. आता परमबीर सिंग, जे लीलावती हॉस्पिटल ट्रस्टचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी प्रशांत बसलेल्या खोलीत काळी जादू केल्याचं त्याने उघड केलंय.
फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, प्रशांत यांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली आठ कलश आढळून आले ज्यात मानवी केस, कवटी, हाडे आणि तांदूळ होते… असे परमबीर यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीदारांच्या उपस्थितीत व्हिडीओग्राफी करताना पूर्ण खबरदारी घेत संबंधित जागा खोदण्यात आली.
खोदल्यानंतर जमितीतून आठ कलश सापडले आहेत. ज्यात काही मानवी अवशेष, केस आणि हाडे होती. अशा वस्तू काळ्या जादूसाठी वापरल्या जात असल्याचं आढळून आलं आहे. रिपोर्टनुसार, रुग्णालयाचे माजी ट्रस्टी आणि अन्य संबंधीत व्यक्तींना 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप नव्या ट्रस्टने केलाय.
याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्र कायद्यान्वये काळी जादू आणि दुष्कृत्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि वांद्रे पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार… पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List