अभिषेक बच्चनमुळे ऐश्वर्या रायने ‘या’ सुपरहिट सिनेमाला दिला होता नकार
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय ओळखली जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ऐश्वर्याने काही हिट सिनेमांना नकारही दिला. 2014 चा तो सुपरहिट चित्रपट ज्यामध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत दिसणार होती. या चित्रपटात इतरही अनेक सुपरस्टार्स दिसले. मात्र अभिनेत्रीने हा चित्रपट नाकारल्याने दीपिका पदुकोणला सुवर्णसंधी मिळाली.
दीपिका पदुकोणच्या पदरात पडलेला हा चित्रपट म्हणजे शाहरुख खान दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘हॅपी न्यू इयर’. हा चित्रपट दीपिकाच्या करिअरसाठी वरदान ठरला असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटात शाहरुख खानची हिरोईन बनण्यास ऐश्वर्या रायने नकार दिला होता. याचे कारण होते अभिषेक बच्चन. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं.
ऐश्वर्याने का दिला नकार
ऐश्वर्या आणि शाहरुख खानने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. जोश आणि देवदासमधील त्यांच्या दोन्ही भूमिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. ऐश्वर्याने तिच्या एका मुलाखतीत हा चित्रपट नाकारण्याचे कारण सांगितले होते. ती म्हणाली होती की, ‘हा चित्रपट मला आधी ऑफर झाला होता, मला त्याची स्क्रिप्टही आवडली होती. अभिषेक आणि मी एकत्र असतो तर आमच्यासाठीही तो सिनेमा खास ठरला असता. स्क्रीनवर आम्ही दोघेही दिसले असतो पण एकत्र दिसलो नसतो. मला ते आवडले नसते. त्यामुळेच मी या चित्रपटाला नकार दिला.’
वाचा: बिनकामाचे वाद उकरून काढून…; मटणाच्या सर्टिफिकेट्सवरुन अभिनेत्याची पोस्ट
‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण ही पहिली पसंती नव्हती हे फार कमी लोकांना माहिती आहे. याआधी हा चित्रपट ऐश्वर्या रायला ऑफर झाला होता. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चननेही काम केले होते. पण ऐश्वर्या राय बच्चनने या चित्रपटाला नकार दिला. या चित्रपटात पुन्हा एकदा शाहरुख आणि ऐशची जोडी होणार होती. पण नंतर दीपिकाला कास्ट करण्यात आले. दीपिकाचा शाहरुखसोबतचा एकही चित्रपट फ्लॉप नाही. ओम शांती ओमपासून ते पठाणपर्यंत शाहरुखसोबत दीपिकाच्या जोडीने नेहमीच लोकांची मने जिंकली आहेत.
‘हॅपी न्यू इयर’ सिनेमाविषयी
‘हॅपी न्यू इयर’ या मल्टीस्टारर चित्रपटात अभिषेक बच्चन, सोनू सूद आणि बोमन इराणी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशनही करण्यात आले. चित्रपटातील गाणीही लोकांना खूप आवडली होती. या चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसणार होते. मात्र, ऐश्वर्याने नकार दिल्यामुळे चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List