आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर पार्टीत एकत्र, तमन्ना भाटिया- विजय वर्माचा व्हिडिओ पाहाच
बॉलिवूडमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. कुणाचं ब्रेकअप तर कुणाचं पॅचअप होतं. अलिकडेच आमिर खानने 60 व्या वर्षी त्याच्या गर्लफ्रेंडविषयी माहिती दिली. प्रेमाला वय नसतं म्हणा, पण सर्वसामान्यांसाठी या गोष्टी नॉर्मल नसतात. आता अशीच एक बॉलिवूडमधली लव्हर स्टोरी किंवा गोड कपल म्हणजे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा, हे होळीनिमित्त एकत्र दिसले खरे पण या कपलच्या एका व्हिडिओनं चाहत्यांना निराश देखील केलं. नेमकं काय घडलं? पुढे वाचा.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे यापूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्सप्रमाणे लोकांचे आवडते कपल बनले आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर याची सुरुवात 2023 मध्ये लस्ट स्टोरीज 2 दरम्यान झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी या दोघांनी आपलं नातं संपुष्टात आणलं आणि आपला मार्ग वेगळा केला. मात्र, अजूनही काही जण त्यांना पुन्हा एकत्र पाहू शकतील, अशी आशा बाळगून आहेत. ब्रेकअपनंतरही दोन्ही स्टार्सनी मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर ते रवीना टंडनच्या होळी पार्टीत सहभागी झाले होते. पण इथे थोडं वेगळंच घडलं.
होळीसंदर्भात बॉलिवूडच्या सर्वच स्टार्सकडे लोकांच्या नजरा खिळल्या होत्या. यावेळी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या होळी पार्टीचा फोटो समोर आल्यानंतर लोक अधिक आनंदी दिसत होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. मात्र तमन्ना आणि विजय दोघेही पार्टीदरम्यान खूप एन्जॉय करताना दिसले.
पार्टीचे फोटो शेअर
पिंकविलाशी बोलताना दोन्ही स्टार्सनी आपलं नातं संपुष्टात आणण्याविषयी सांगितलं. दिग्दर्शक अभिषेक कपूर, त्याची पत्नी प्रज्ञा कपूर, आशिष चंचलानी यांच्यासह अनेकांनी होळी पार्टीला हजेरी लावली होती. तमन्नाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय प्रज्ञा कपूरनेही फोटो शेअर केले आहेत.
‘मी आधीच ठरवलं होतं’
तमन्ना आणि विजयच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर याची सुरुवात 2023 मध्ये लस्ट स्टोरीज 2 दरम्यान झाली होती. काही काळानंतर दोन्ही कलाकारांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. दोघांच्या ब्रेकअपबाबत वेगवेगळी कारणं समोर येत होती, पण या प्रकरणी स्टार्सकडून कोणतंही वक्तव्य समोर आलं नाही. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी असेही सांगितले की, दोघांनी मार्चच्या सुरुवातीला विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List