Mahashivratri 2025 – सिद्धनाथ मंदिरातील शिवलिंग आज दर्शनासाठी खुले

Mahashivratri 2025 – सिद्धनाथ मंदिरातील शिवलिंग आज दर्शनासाठी खुले

म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेले स्वयंभू शिवलिंग दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. बुधवारी (26 रोजी) महाशिवरात्रीनिमित्त हे भुयार खुले केले जाणार आहे, अशी माहिती सिद्धनाथ देवस्थानचे चेअरमन वैभव गुरव, व्हाइस चेअरमन रविकिरण गुरव, सचिव दिलीप कीर्तने यांनी दिली.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागांतील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ मंदिरातील भुयारात स्वयंभू शिवलिंग आहे. श्रीधर स्वामींच्या ‘काशिखंड’ ग्रंथामध्ये कालभैरवाच्या उत्पत्तीविषयी देण्यात आलेल्या माहितीनुसार शिव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण? असा वाद निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, ‘शिवस्वरूप ब्रह्म अग्रगण्य आहे. सर्वकाही शिवाच्या अधीन असते, त्यामुळे सर्वश्रेष्ठ शिवच आहे.’ हे ऐकून ब्रह्मा आणि विष्णू यांना राग आला आणि त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हे ऐकून शिवाचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला असता, भुजदंडातून महांकाळ म्हणजेच काळभैरवाची उत्पत्ती झाली. त्याच वेळी शिवाच्या श्रेष्ठत्वाची प्रचीती सर्वांना आली. शिवशंकर लिंगरूपाने म्हसवड येथील भुयारात स्थित झाले. त्यामुळे म्हसवडचे श्री सिद्धनाथांचे स्थान मूळ काशी विश्वेश्वर काळभैरव शंकराचे मानले जाते. विश्वेश्वराचे रक्षणकर्ते म्हणून काशीतही काळभैरवांचा मान प्रथम आहे. शिवाचे रक्षणकर्ते व शिवअवतार म्हणून काळभैरव म्हणजेच सिद्धनाथ व पत्नी जोगेश्वरी येथील मंदिराच्या गाभाऱ्यात भुयारात असणाऱ्या सिंहासनावर आरूढ झाले, अशी आख्यायिका आहे.

सिद्धनाथ मंदिरातील भुयार फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. वर्षभर हे भुयार बंद असते. मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या बाजूला भुयाराचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या छोटेखानी पलंगावर श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्ती ठेवलेल्या असतात. भुयारातील शिवलिंगावर बांधण्यात आलेल्या सिंहासनावर श्री सिद्धनाथाच्या मूर्तीबाबतही एक गोष्ट आश्चर्यकारक आहे. ती म्हणजे, मंदिरातील सिंहासनावर असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या मूर्तींना रोज सकाळी पंचामृत व गरम पाण्याने अभ्यंगस्नान घातले जाते. त्यावेळी भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर थेंब-थेंब पाणी पडत असते. वर्षभर बंद असलेल्या भुयारातील शिवलिंगाला रोज जलाभिषेक होतो, हा पौराणिक वास्तुशिल्पाचा एक खास नमुना आहे.

महाशिवरात्रीला भुयारातील शिवलिंगास पारंपरिक पद्धतीने जलाभिषेक व पंचामृताचा अभिषेक करून दहीभाताची पूजा बांधली जाते. त्यानंतर हे शिवलिंग भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते.

एका वेळी 8 ते 10 भाविकांना दर्शन 

भुयाराची उंची 12 फूट असून, आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. एकाच व्यक्तीला जाता येईल इतकी अरुंद वाट असल्याने एकावेळी 8 ते 10 भाविकांनाच दर्शनासाठी सोडले जाते. त्यांना वर घेतल्यानंतर दुसऱ्यांना सोडले जाते. भाविकांना भुयारात सोडणे व वर घेणे हा प्रकार आजपर्यंत सुरू होता. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होऊन विलंब लागत होता. मात्र, आता देवस्थान ट्रस्टकडून भुयारात उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. या काळात भाविकांची गर्दी होत असल्याने यावेळी मंदिर परिसराला एका छोट्या यात्रेचेच स्वरूप येते. रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत भाविक दर्शनरांगेतूनच दर्शन घेत असतात. यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येतो. भुयारातील स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनानेच येथील महाशिवरात्रीची सांगता होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती? Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?
Rohit Sharma Net Worth: भारताने चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा चार विकेटने पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारत एकही...
राज्याच्या लालपरीची झोळी रिकामीच, बजेटमध्ये शिळ्या कडीला ऊत, युनियन नेत्याची टीका
Maharashtra Budget: उद्धव ठाकरे समोर येताच देवेंद्र फडणवीस यांचा नमस्कार, पण एकनाथ शिंदे यांनी केले दुर्लक्ष
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा नवरा अखेर बोलला… सांगितलं टॉप सिक्रेट!
शाहरुख खानवरचं ते संकट टळलं, अखेर ती केस जिंकलाच; काय होतं नेमकं?
अभिनेत्री सायली संजीव अशोक सराफांना ‘पप्पा’ का म्हणते? आहे खास कारण
खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू; जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय