नाना पाटेकर यांना ‘मी टू’प्रकरणी दिलासा
लैंगिक छळाचा आरोप प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभिनेते नाना पाटेकर यांना अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पुरेशा पुराव्या अभावी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दाखल केलेली लैंगिक शोषणाची तक्रार दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिनेत्री तनुश्रीने 2008 साली नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्या विरोधात डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या सह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात विनयभंग तसेच धमकीची तक्रार दाखल केली. या खटल्यावर दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. नाना पाटेकर यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List