IIFA 2025- जब वी मेट… करीना आणि शाहिद कपूरच्या ‘झप्पी’ची चर्चा, व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रियांचा महापूर
करीना कपूर आणि शाहिद कपूर इंडस्ट्रीमधलं एक स्वीट कपल… दोघांचंही ब्रेकअप झालं आणि त्यांच्या चाहत्यांच्याही काळजावर या ब्रेकअपचे चरे उमटले. करीना आणि शाहिदचा ‘जब वी मेट’ हा एकत्र काम केलेला शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान या दोघांतील नात्याचाही शेवट झाला होता.
करीना कपूर आणि शाहिद कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसायचे. एकमेकांच्या शूटींगच्या सेटवरही हे दोघे हजर असायचे. एकमेकांशिवाय न राहणाऱ्या या जोडप्यामध्ये आड आला तो, व्यवहार. शाहिद कपूर आणि करीना कपूर या दोघांची तुलना केल्यास, शाहिदकडे हिट म्हणावा असा कोणताच चित्रपट त्याकाळी नव्हता. त्यामुळेच या नात्याचा शेवट झाल्याचे म्हटले जाते.
दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतर, करीनाने 2012 मध्ये सेफ अली खान सोबत लग्न उरकले. सेफ अली खानचे हे दुसरे लग्न होते, परंतु करीना त्याची दुसरी बेगम होण्यास अगदी स्वेच्छेने तयार झाली होती. शाहीद कपूरने एव्हाना लग्नाचा विचारही केला नव्हता, परंतु करीना सेटल झाल्यानंतर त्यानेही 2015 मध्ये मीरा सोबत लग्न केले.
लग्नानंतर विविध कार्यक्रमांमध्ये हे दोघे समाेरासमोर आले, परंतु एकमेकांकडे या दोघांनीही कायमच दुर्लक्ष केले. केवळ दुर्लक्षच नाही तर, नजरेसमोर आल्यावरही एकमेकांना नजर देणेही यांनी टाळलं होतं. परंतु नुकत्याच झालेल्या IIFA 2025 सोहळ्यात मात्र करीना आणि शाहिद कपूर केवळ समोरच आले नाही. तर या दोघांनीही एकमेकांना मीठी मारत, कॅमेरासमोर एकमेकांसोबत गप्पाही मारल्या.
या क्षणांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मीडीयाचे कॅमेरा तर चांगलेच सरसावले होते. परंतु हे क्षण आणि व्हिडीओ सोशल मीडीयावर आल्यावर, फॅन्सकडून प्रतिक्रियांचा चांगलाच वर्षाव झाला. यातील अनेक प्रतिक्रिया या केवळ बोलक्याच नव्हत्या. तर काही प्रतिक्रिया वाचून हसता हसता पुरेवाट झाली. शाहिद कपूरने या घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हणाला, की हम इधर उधर मिलते रहतें ही हैं… त्याच्या या प्रतिक्रियेवर तर आता चाहतेही विचार करु लागले आहेत. हे नेमके कसे कधी आणि कुठे भेटतात..
करीना कपूर शाहिद कपूर भेटीनंतर सोशल मीडीयावरील ठराविक प्रतिक्रिया
आज रात्री शाहिदला मीरा जेवायला देणार नाही!
आता कपूर कपूर एकत्र येऊन पुन्हा गुटरगू करणार!
आज रात्री सेफ पुन्हा एकदा घराबाहेर पडणार!
आता तुफान राडा होणार सेफ आणि करीनामध्ये!
आता सैफ तिसरे लग्न करणार का?
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List