तिसरी मुलगी झाली तर 50 हजार रुपये, मुलगा झाल्यास गाय; आंध्र प्रदेशच्या खासदारकाडून घोषणा
तिसरी मुलगी जन्माला आल्यास पालकांना 50 हजार रुपये तसेच मुलगा झाल्या गाय दिली जाईल अशी घोषणा आंध्र प्रदेशच्या खासदारांनी केली आहे. या घोषणेवरून राज्यात चर्चांना उधाण आले असून अनेकांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.
आंध्र प्रदेशमधील तेलुग देसम पक्षाचे खासादर कलीसेट्टी अप्पलनायडू यांनी ही घोषणा केली आहे. जर कुणा दाम्पत्याला तिसरी मुलगी झाली तर त्यांना 50 हजार रुपये बक्षीस दिले जाईल. आणि जर मुलगा झाला तर गाय दिली जाईल अशी अप्पलनायडू यांनी घोषणा केली आहे.
लोकसंख्या वाढली पाहिजे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली होती. त्यानंतर खासदार अप्पलनायडू यांनी ही घोषणा केली आहे. एखाद्या महिलेले कितीही अपत्य असली तरी त्यांना प्रसूती रजा मिळेल असे मुख्यमंत्री नायडू म्हणाले.
मुख्यमंत्री नायडू म्हणाले की सर्व महिलांना जेवढ्या मुलांना जन्म देता येईल तेवढ्या मुलांना जन्म द्या. मुल जन्माला घालणाऱ्या महिलांना फक्त दोनच नव्हे तर जेवढ्या वेळा मुलांना जन्म द्याल तेव्हा प्रसूती रजा दिल जाईल असेही नायडू म्हणाले.
राज्यात आतापर्यंत महिलांना दोनच प्रसूती रजा मिळत होत्या. आता त्यांना त्यापेक्षा जास्त रजा मिळतील अशी घोषणा मुख्यमंत्री नायडू यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List