अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करणार का? संजय राऊत यांचा महायुतीला सवाल

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करणार का? संजय राऊत यांचा महायुतीला सवाल

राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी मतं विकत घेण्यासाठी ज्या पद्धतीने सरकारी तिजोरीचा वापर किंवा गैरवापर केला तो इतका टोकाला गेला आहे की त्यांना आता मागे हटता येणार नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीना 2100 रुपये देण्याची घोषणा करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी महायुतीला विचारला आहे.

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होतेय का हे आम्हाला पहायचंय आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये जाहीर होणार का. कारण या दोन संकल्पावरच त्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला. महिलांची, बहिणीची, कष्टकऱ्यांची. पण ज्या पद्धतीचा आर्थिक अहवाल आला आहे. की महाराष्ट्र कसा कर्जाच्या ओझ्याखाली तडफडतोय, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे, त्यामुळेच आम्हाला राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता आहे. पण राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी मतं विकत घेण्यासाठी ज्या पद्धतीने सरकारी तिजोरीचा वापर किंवा गैरवापर केला तो इतका टोकाला गेला आहे की त्यांना आता मागे हटता येणार नाही. ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली, त्या घोषणा या अर्थसंकल्पात तुम्हाल पूर्ण कराव्या लागतील असे संजय राऊत म्हणाले.

संसदेत तीन मुद्दे महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांचा अपमान केला. जरी ते नरेंद्र मोदी असले तरी ज्या पद्धतीने आपल्या पंतप्रधानांना व्हाईट हाऊसमध्ये अपमानित केला तो अत्यंत गंभीर मुद्दा आहे. हा अपमान नरेंद्र मोदींचा नसून सार्वभौम भारताच्या पंतप्रधानांचा आहे. व्हाईट हाऊसमधली अतिरिक्त सचिव पंतप्रधान मोदींचं स्वागत करायला येते, आणि छोट्या राज्यांसाठी डोनाल्ड ट्रम्प बाहेर येतात, हा आमच्या देशाचा अपमान आहे. ज्या पद्धतीने मोदी आणि ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेत भारताला अपमानित करण्यात आलं. टेरिफ कमी करण्यासाठी दबाव आणला गेला, जी भाषा ट्रम्प करत आहेत. म्हणजे भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहे का? भारत हे अमेरिकेचे गुलाम राष्ट्र झाले आहे का? ही सुद्धा देशातील लोकांच्या मनात शंका आहे असे संजय राऊत यांनी नमूद केले.

तमिळनाडू राज्यात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सरकारसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत, सीमांकनाचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोगस मतदान कार्डांचा मुद्दा उपस्थित केला. बोगस कार्ड जी झारखंड, गुजरात आणि बिहारमध्ये सुद्धा मिळालेली आहेत. जो खेळ महाराष्ट्रात, हरयाणात, दिल्लीत झाला तोच खेळ पश्चिम बंगालमध्ये खेळण्याचा प्रयत्न भारतीय निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून करणार होता, पण तृणमूल काँग्रेसने याला ब्रेक लावला, यावर संशोधन केले आणि निवडणूक आयोगाला चूक मान्य करावी लागली. देशासाठी हा विषय अत्यंत गंभीर आहे. भाजप आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आणि बोगस मतदार तयार करून, त्यासाठी बोगस कागदपत्र तयार करून हरयाणा, दिल्ली, महाराष्ट्र आणि आता पश्चि बंगाल कदाचित बिहारसु्द्धा या निवणुका जिंकल्या जात आहेत. हे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समोर आणलं आहे. ही बाब तृणमूल सह आम्ही सर्वांनी गांभीर्याने घेतली आहे, यावर नक्कीच आम्हाल चर्चा हवी आहे अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

कोट्यवधी रुपये कारखान्यांना दिले. त्यामध्ये संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. 80 कोटी, 139 कोटी, 160 कोटी दिले गेले. ही पैश्यांची लूट आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी अशा पैश्यांची लूट थांबवली होती. अशा कोणत्याही भंगारात जाणाऱ्या कारखान्याला जनतेचा पैसा देणार नाही ही त्यांची भूमिका होती. या पैशांची हमी कोण घेणार? कोट्यवधी रुपयांची ही लूट आहे, पण पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभेला मदत केल्याच्या बदल्यात, पक्षांतर केल्याच्या बदल्यात. संजय मंडलिकांना का देण्यात आले 139 कोटी? पक्ष सोडण्याची किंमत. ज्यांनी ज्यांनी हे भ्रष्ट सरकार आणायला मदत केली, आणि त्याची किंमत चुकवलेली आहे. लाडक्या बहीणींना 1500 रुपये दिले. आणि यांना 80 कोटी पासून 180 कोटी रुपये दिलेत अशी टीकाही संजय राऊत यांन केली.

तुषार खरात हे सातारा भागातील पत्रकार आहेत. तुषार खरात हे स्वतःचं युट्युब चॅनेल चालवतात. तुषार खरात यांनी फडणवीस मंत्रीमंडळातले गोरे यांच्या संदर्भातले जळजळीत सत्य समोर आणलं. त्यावर आम्ही अनेकदा चर्चा केली. विधानसभेत मुद्दा मांडला. संबंधित महिलेने राजभवनात पत्र दिलेलं आहे. संबंधित महिला माधम्यांसमोर आपली भूमिका मांडत आहे, मग त्या महिलेला का अटक नाही केली? त्या महिलेवर का हक्कभंग आणला तुम्ही? कारण तुषार खरात हे सामान्यांचे पत्रकार आहे, ते झगडत आहेत, त्यांना तुम्ही अटक केली. हा महाराष्ट्रातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा हल्ला आहे. फडणवीसांनी आपले कारनामे थांबवले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे सारखी प्रकरणं सुरू आहेत, दहशत, दबाव, दडपशाही. पण तुषार खरात यांच्या पाठीमागे सर्व पत्रकरांनी उभं राहिलं पाहिजे. हा फक्त तुषार खरात यांच्यावरचा हल्ला नाहिये. हा महाराष्ट्राला महानतेची परंपरा आहे, जी नावं घेतो टिळक, आगरकर, ठाकरे आणि आम्ही सगळे काम करतोय पत्रकारितेत. या पत्रकारितेचा गळा घोटण्याचा काम सुरु आहे. जयकुमार गोरे यांनी त्या पत्रकारावर हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. मग हक्कभंग समिती निर्णय घेईल ना. तुम्ही खोटे गुन्हे नोंदवून अशा प्रकारे अटक करताय, मिस्टर गोरे तु्म्ही स्वतःला कोण समजता, तुम्ही गुंड असाल, तुम्ही माफिया असाल, तुम्ही माफिया असाल, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे लंगोटीया यार असाल. पण अशा प्रकारे महाराष्ट्रांच्या पत्रकारांवर हल्ले करण्याचा प्रयत्न कराल, तर तो तुम्हाला महाग पडेल. तुषार खरात याच्यावरचे सगळे गुन्हे खोटे आहेत, सकाळीच मी याबाबत माहिती घेतली. या घटनेवर माझं लक्ष आहे असेही संजय राऊत म्हणाले.

फक्त ओबीसीच नव्हे सर्व समाजाचे मला नेतृत्व करायचे आहे. असे पंकजा मुंडे जर म्हणाल्या तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या जबाबदार मंत्री आहेत, पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी या राज्याचे नेतृत्व केले आहे. आणि त्यांचं नेतृत्व हे सर्वसमावेशक होतं. सर्व समजाचं होतं. आणि जर पंकजा मुंडे यांची भूमिका अशी असेल तर यालाच तर पुरोगामी नेतृत्व म्हणतात असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा...
Maharashtra Budget: छावा चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पोहचला, आता अर्थसंकल्पात महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा
अर्थसंकल्प 2025 : अजितदादांच्या 15 घोषणा काय आहेत पहा ?
Maharashtra Budget: लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार…
Maharashtra Budget: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होणार? अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा
Maharashtra Budget: अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लाडक्या बहिणी अन् पुन्हा आलो, पुन्हा आलो…
माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा…अमिताभ यांचे प्रॉपर्टीविषयी वक्तव्य; कोट्यवधींची संपत्ती नेमकी कोणाला मिळणार?