लोणावळ्यात साकारणार ‘ग्लास स्कायवॉक’, प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर; शंभर कोटींचा खर्च अपेक्षित

लोणावळ्यात साकारणार ‘ग्लास स्कायवॉक’, प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर; शंभर कोटींचा खर्च अपेक्षित

लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट व लायन्स पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाच्या मार्गातील जवळपास सर्वच अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) या प्रकल्पाची उभारणी केली जाईल. यामुळे लवकरच पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या यादीत आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे

लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव आणि विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. या परिसराला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. हिल स्टेशन अशी ओळख या परिसराची असली तरी येथील अनेक ठिकाणांना ऐतिहासिक संदर्भही आहेत. येथील प्राचीन व पुरातन कार्ला, भाजे व बेडसे लेणी, शिवरायांनी उभारलेले विसापूर, लोहगड, तुंग, तिकोणा, राजमाची, कोराईगड हे गड किल्ले तसेच पवना, वलवण, लोणावळा, भुशी, उकसान, मळवंडीतुले, तुंगार्ली ही जलाशये. टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची, नागफणी (ड्युक्सनोज) ही ठिकाणे पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षण राहिली आहेत.

वर्षाविहारासाठी ग्रामीण भागातील भाजे लेणी धबधबा, कार्ला लेणी धबधबा, लोहगड व विसापूर किल्ला परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याशिवाय लोणावळ्यातील लाइन्स पॉइंट, टायगर पॉइंट, घुबड तलाव, तुंगार्ली डॅम, अमृतांजन पॉइंट, राजमाची पॉइंट याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. लोणावळ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत. पावसाळा सुरू झाला की, अनेकजण मित्र-मैत्रिणींसह पिकनिकची तयारी करतात. वर्षाविहारासाठी मुंबईकर, पुणेकरांची पावले लोणावळ्यातील भुशी डॅम, लोणावळ्यातील विविध पॉइंट्स, गड किल्ले, धबधब्यांकडे वळतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून उन्हाळ्यातही लोणावळा परिसरात पर्यटकांची रेलचेल असते.

काही दिवसांपूर्वी मुंबईत पर्यटननगरी लोणावळा शहर सहीत मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक आढावा बैठक घेतली. यावेळी ग्लास स्कायवॉक प्रकल्पाच्या आराखड्यासाठी व उभारणीसाठी पर्यटन विभागाऐवजी पीएमआरडीएकडे ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोणावळा शहर आणि परिसरातील निसर्गसंपदा लक्षात घेता पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला ग्लास स्कायवॉक उभारावा, असे अजित पवार यांनी सुचविले होते. या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना, तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट केले होते. दरम्यान, पर्यटन विभागाने या काळात असमर्थता दर्शविल्यानंतर पीएमआरडीएने हे काम हाती घेतले आहे.

४.८४ हेक्टर परिसरात प्रकल्प

‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यानंतर पीएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा समावेश ४.८४ हेक्टर परिसरात होणार आहे. झिप लायनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, अॅम्फी थिएटर, ओपन जिम आणि विविध खेळ यांचा यात समावेश असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पावर सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये..” फॅनने अचानक आलियाचा हात धरला, रणबीरने सुनावलं अन् नेटकरीही संतापले “ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये..” फॅनने अचानक आलियाचा हात धरला, रणबीरने सुनावलं अन् नेटकरीही संतापले
बॉलिवूड सेलिब्रिटींना चाहत्यांमुळे अनेकदा समस्यांना तोंड द्यावं लागतं. फॅन्सबाबतचे बरेच विचित्र किस्से सेलिब्रिटींसोबत घडत असतात. असाच एक किस्सा आलियासोबतही घडला....
‘छावा’ बघून हंबरडा फोडणाऱ्या नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे..; किरण मानेंजी जोरदार टीका
Chhaava सिनेमाचा शेवटचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा, कवी कलश यांनी रचलेल्या ‘त्या’ कवीता, नक्कीच वाचा
म्हणून ‘या’ मराठी कलाकाराने नाकारली “छावा” चित्रपटातील ती भूमिका; Video होतोय प्रचंड व्हायरल
‘छावा’ सिनेमा, गणोजींच्या भूमिकेत दिसलेला सारंग साठ्ये म्हणतो, ‘लोकं मारायला निघालेत कारण…’
Pune Crime News – स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपीचा शोध सुरू
ड्रायफ्रूटस् भिजवून खा, शरीराला मिळतील खूप सारी पोषकतत्वे आणि भरपूर फायदे