कैदीव्यक्त होतात अन् अडचणींवर होते मात, ‘हेल्प डेस्क’ ठरतेय यशस्वी; समुपदेशकांच्या माध्यमातून होतोय संवाद
>> आशीष बनसोडे
कारागृहाच्या चार भिंतींच्या आत गेल्यावर मनातले बोलायचे कसे आणि कोणाशी… बोलले तरी ऐकले जाईल का? या आणि अशा विचारांनी कैदी व्यक्त होत नाहीत अन् असेच खितपत पडून राहतात, मात्र भायखळा कारागृहात याला छेद देण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाने कैद्यांच्या पोटातले ओठांवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. परिणामी कैदी व्यक्त होऊ लागल्याने त्यांचा त्यांना चांगलाच फायदा होऊ लागला आहे.
मनुष्य कारागृहात असला किंवा बाहेर असला तरी त्याच्या अनंत अडचणी असतात. चार भिंतींच्या आत गेल्यावर तर साधी अडचणदेखील डोंगराएवढी वाटू लागते. बरेच कैदी त्यांच्या अडीअडचणी, काय हवं-नको ते सांगत नाही. परिणामी याचा त्यांच्या मानसिक स्वास्थावर विपरित परिणाम होतो. वर्षानुवर्ष ही समस्या असून त्यावर तोडगा काढण्याचा देखील प्रयत्न झाला, परंतु भायखळा कारागृह प्रशासनाने कैद्यांना एकटेपणा सतावू नये आणि त्यातून ते नैराश्याच्या गर्तेत सापडून नये याकरिता ‘हेल्प डेस्क’ सुरू केला आहे. अंगण या सामाजिक संस्थेच्या मदतीने 21 मे 2024 पासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत 669 पैद्यांना या हेल्प डेस्कचा फायदा झाला. या कालावधीत 27 गळाभेट घडवून आणता आली. 46 कैद्यांची ई-मुलाखत झाली तर 52 जणांनी फोन कॉल्सद्वारे आप्तेष्टांना संपर्क साधून आपले मन हलके केल्याचे कारागृह अधीक्षक विकास रजनलवार यांनी सांगितले. तुरुंगाधिकारी अमृता दशवंत आणि त्यांचा स्टाफ हा डेस्क व्यवस्थितरीत्या हाताळत असून कैद्यांना शक्यतोपरी मदत करण्याचे कर्तव्य पार पाडत आहे.
कारागृहात प्रसन्न वातावरण राहावे, कोणालाही एकटेपणा सतावू नये, अडचणी सांगितल्यास त्या केल्या जातात, त्यामुळे कैदी आनंदी राहतात आणि त्यातून त्यांच्यात सकारात्मक वाढण्यास मदत होते. ‘हेल्प डेस्क’ हा उपक्रम पैद्यांना खूपच फायद्याचा ठरत आहे. – विकास रजनलवार, अधीक्षक, भायखळा कारागृह
n कारागृहात गेल्यावर कैदी एकाकी पडतात तर बरेच जण नैराश्यात सापडतात. यावर तोडगा म्हणून हेल्प डेस्क सुरू केला आहे. अंगण संस्थेचे समुपदेशक कैद्यांशी संवाद साधतात. त्यांना काय अडचणी आहेत, काय हवं-नको ते त्यांच्याकडून काढून घेतात आणि ते प्रशासनाला सांगतात. त्यातून कैद्यांच्या बऱ्याच अडचणी जसे की कुटुंबीय, नातेवाईकांशी बोलणे, 18 वर्षांखालील अपत्य असेल तर त्याची थेट गळाभेट घेणे, काही बाबी न्यायालयासमोर मांडून त्यावर मार्ग काढण्यास मदत करणे, असे कार्य केले जात आहे.
– आठवडय़ातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी पह्न कॉलवर बोलू दिले जाते, तर आठवडय़ातून एकदा 20 मिनिटांसाठी ई-मुलाखतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिन्यातून दोन वेळा गळाभेट करून दिली जाते. कैद्यांना त्यांचा छंद जोपासण्यासाठी शक्य ती मदत केली जाते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List