अनोळखी व्यापाऱ्यांशी व्यवहार अंगलट , निर्यातदार कंपन्यांचा उरणच्या मच्छीमारांना कोट्यवधींचा गंडा

अनोळखी व्यापाऱ्यांशी व्यवहार अंगलट , निर्यातदार कंपन्यांचा उरणच्या मच्छीमारांना कोट्यवधींचा गंडा

पारंपरिक व्यापाऱ्यांना डावलून अनोळखी व्यापाऱ्यांबरोबर केलेला व्यवहार उरणमधील मच्छीमारांच्या अंगलट आला आहे. निर्यातदार कंपन्यांनी या मच्छीमारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सुरुवातीला या कंपन्यांनी चांगला मोबदला दिला. मात्र आता या निर्यातदार कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी गायब झाल्याने मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. होळीचा सण जवळ आलेला असल्याने त्यांना कर्ज काढून खलाशांचे पगार द्यावे लागत आहेत.

मुंबईतील ससून डॉक बंदरातील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे सर्व सोयीसुविधांयुक्त अत्याधुनिक मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. सुमारे 250 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आले आहे. मासळीच्या निर्यातीसाठी रायगड जिल्ह्यासह स्थानिक हजारो मच्छीमारांना करंजा मच्छीमार बंदर सोयीचे आणि फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे या करंजा मच्छीमार बंदरातून मागील चार महिन्यांतच सुमारे 300 कोटी रुपयांची मासळी निर्यात करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी करंजा मच्छीमार बंदरात मासळीच्या खरेदी, विक्रीतून अंग काढून घेतले आहे. याचा फायदा उठवत काही नव्या निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी बंदरात शिरकाव केला आहे.

■ बंदरातील शेकडो स्थानिक मच्छीमारांनीही परिचित स्थानिक दलालांवर विश्वास टाकून मासळी विक्रीचे व्यवहार निर्यातदार कंपन्यांशी केले आहेत. सुरुवातीला निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांना मालाचे पैसे देऊन मच्छीमारांचा विश्वास संपादन केला.
■ गेल्या काही महिन्यांपासून मात्र या कंपन्यांनी स्थानिक मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवण्यास सुरुवात केली. आता कोट्यवधींची थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी पळ काढला आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार

निर्यातदार कंपन्या आणि अपरिचित व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक केली असल्याचे निदर्शनास येताच अनेक स्थानिक मच्छीमारांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र निर्यातदार कंपन्यांनी मासळीचे पैसे अदा केले नसल्याने मच्छीमारांची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे ऐन होळीच्या सणातच सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज काढून, दागदागिने गहाण ठेवून त्यांना खलाशांचे पगार, देणी चुकवावी लागत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमार, व्यापारी रमेश नाखवा यांनी दिली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी
सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय...
युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’
पार्टटाईमच्या नादात गमाविले 11 लाख
शिवसेना अहिल्यानगर शहरप्रमुखपदी किरण काळे
मेट्रो ट्रॅकवर राडा! आंदोलकांना चोप; पोलिसांवर पेट्रोल फेकल्याने तणाव
विदेशात नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक, गाड्या व दुकाने जाळली