ठाणे पोलिसांनी पुरवले लाडक्या बहिणींचे डोहाळे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम केले जातात. मात्र ठाणे पोलिसांनी शहरातील १९ महिला पोलिसांचे डोहाळे पुरवले आहेत. या अनोख्या कार्यक्रमात सात महिने व त्यावरील गर्भवती असलेल्या महिला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन महिला कर्मचाऱ्यांची खणा, नारळाने ओटी भरतानाच त्यांचे डोहाळे जेवण केले. इतकेच नाही तर गर्भवतींना तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत घ्यावयाची काळजी, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या व साड्यांचे वाटप करण्यात आले. पोलिसांच्या मायेने या ‘लाडक्या’ बहिणी गहिवरून गेल्या. ठाणे शहर पोलीस हॉस्पिटल व जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमासाठी उपायुक्त मीना मकवाना, डॉ. माधव वाघमारे, पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, डॉ. फडणवीस तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List