Steam Bath Benefits- वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत शरीराला स्टीम बाथचे होतील खूप फायदे!

Steam Bath Benefits- वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत शरीराला स्टीम बाथचे होतील खूप फायदे!

 

शरीराचं थकणं म्हणजेच मनाचं थकणं असतं. या मनाला आणि शरीराला तजेला आणण्यासाठी स्टीम बाथ हा सर्वात उत्तम उपाय मानला जातो. स्टीम बाथ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं गेलेलं आहे. आयुर्वेदामध्येही स्टीम बाथला खूप महत्त्व दिलं गेलंय. स्टीम बाथमुळे आपले शरीर तंदुरुस्त तर राहतेच, पण त्यामुळे त्वचा सुंदर बनण्यासही मदत होते. स्टीम बाथ केल्यास, आपल्या शरीराचा थकवा आणि सांध्यांच्या आरोग्यासाठीही उत्तम असते.

 

 

स्टीम बाथ करण्याचे फायदे

स्टीम बाथ मधुमेहींसाठी अतिशय उत्तम मानले जाते. तसेच स्टीम बाथमुळे जमा झालेला कफ बाहेर काढण्यासही खूप मदत होते.

 

सायनसच्या रुग्णांसाठी स्टीम बाथ खूप फायदेशीर आहे.

 

हृदयाच्या रुग्णांसाठी स्टीम बाथ खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते म्हणजेच रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

 

 

 

 

उन्हाळ्यात घामामुळे त्वचेची छिद्रे अनेकदा बंद होतात. तुम्ही दररोज स्टीम बाथ घेतल्यास तुमच्या शरीरातील घाण काढून टाकण्यासोबतच तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतात.

 

योग्य पद्धतीने स्टीम बाथ केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. यामुळे वजनही कमी होते. याशिवाय, आपले शरीर गरम पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा ते ल्यूकोसाइट्सला उत्तेजित करते. या पेशी संसर्गाशी लढण्यास मदत करतात. दररोज स्टीम बाथ घेतल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती आणखी वाढण्यास मदत होते.

 

स्टीम बाथ केवळ मनाला ताजेतवाने करत नाही तर शरीरातील थकवा आणि निद्रानाशाची समस्या देखील दूर करते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी
सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय...
युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’
पार्टटाईमच्या नादात गमाविले 11 लाख
शिवसेना अहिल्यानगर शहरप्रमुखपदी किरण काळे
मेट्रो ट्रॅकवर राडा! आंदोलकांना चोप; पोलिसांवर पेट्रोल फेकल्याने तणाव
विदेशात नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक, गाड्या व दुकाने जाळली