Weight Gaining Diet- वजन वाढविण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा, महिन्याभरात वजन नक्कीच वाढेल!

Weight Gaining Diet- वजन वाढविण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा, महिन्याभरात वजन नक्कीच वाढेल!

आजकाल वजन कमी करण्याच्या नादात वजनाशी संबंधित एका समस्येकडे क्वचितच आपले लक्ष वेधले जाते आणि ते म्हणजे वजन कमी होणे. वजन कमी झाल्यामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि महिलांमध्ये अशक्तपणाची समस्या उद्भवते. कमी वजन असण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक कारण आहाराकडे दुर्लक्ष करणे हे असू शकते. वजन वाढविण्यासाठी पावडर किंवा बाजारात उपलब्ध असलेली कोणतीही औषधे वापरण्यास सुरुवात केली असेल तर, त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. वजन वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली दिनचर्या बदलणे.

वजन वाढविण्यासाठी काय खायला हवे?

दूध

निरोगी राहण्यासाठी आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला दूध घेण्याचा सल्ला दिला जातो. वजन वाढवायचे असेल तर फुलफॅट दूधाचे सेवन करा. दुधात प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅट देखील असतात, त्यामुळे वजन वाढते. तुम्ही बदाम, अंजीर, खजूर यांसारखे ड्रायफ्रूट्स दूधामध्ये घालू शकता. त्यातून अतिरिक्त कॅलरीज मिळतील आणि निरोगी पद्धतीने वजन वाढवता येईल.

केळी

रोज केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तुम्ही रोज 4 केळी खाऊ शकता. वजन वाढवण्यासाठी केळी खूप महत्त्वाची आहेत. केळ्यामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच फ्रुक्टोज (फळांमधून साखर) चे प्रमाण इतर फळांपेक्षा जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

अंडी अंड्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असल्यामुळे अंडी वजनवाढीसाठी उत्तम आहार म्हणून ओळखला जाते. अंड्यांमध्येही भरपूर फॅट असते, जे वजन वाढवण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आहारात रोज 6 उकडलेल्या अंडी समाविष्ट करू शकता. तुम्हाला हवे असल्यास काहींचे अंड्यातील पिवळ बलक काढून त्याचे सेवन करू शकता.

बेदाणा
बेदाण्यामध्ये भरपूर पोषक असतात त्यामुळे याचे रोज सेवन केले तर ते तुमचे वजन निरोगी पद्धतीने वाढवण्यास मदत करेल. बेदाणे कोरडे आणि भिजवून दोन्हीही पद्धतीने खाणे केव्हाही उत्तम.

शेंगदाणा

शेंगदाण्यामध्ये भरपूर कॅलरी आणि फॅट असते, त्यामुळे वजन वाढवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे मानले जातात. शेंगदाणे आणि मनुके रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात खा. तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता. याशिवाय वजन वाढवण्यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये पीनट बटर आणि ब्रेडचाही समावेश करू शकता. वजन वाढविण्यासाठी जिम ट्रेनर्स अनेकदा पीनट बटर खाण्याचा सल्ला देतात.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती? Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?
Rohit Sharma Net Worth: भारताने चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा चार विकेटने पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारत एकही...
राज्याच्या लालपरीची झोळी रिकामीच, बजेटमध्ये शिळ्या कडीला ऊत, युनियन नेत्याची टीका
Maharashtra Budget: उद्धव ठाकरे समोर येताच देवेंद्र फडणवीस यांचा नमस्कार, पण एकनाथ शिंदे यांनी केले दुर्लक्ष
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा नवरा अखेर बोलला… सांगितलं टॉप सिक्रेट!
शाहरुख खानवरचं ते संकट टळलं, अखेर ती केस जिंकलाच; काय होतं नेमकं?
अभिनेत्री सायली संजीव अशोक सराफांना ‘पप्पा’ का म्हणते? आहे खास कारण
खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू; जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय