मुंबई-न्यू यॉर्क एअर इंडिया विमानात बॉम्बची अफवा, उड्डाणानंतर विमानाची ईमर्जन्सी लँडिंग
मुंबईहून न्यू यॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने विमानाचे पुन्हा मुंबई विमानतळावर ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सोमवारी सकाळी मुंबईहून न्यू यॉर्कसाठी विमानाने उड्डाण घेतले. यानंतर विमानाच्या शौचालयात बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे पुन्हा ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
विमानात 19 क्रू मेंबर्ससह 322 प्रवाशी होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.15 वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशांची हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा एजन्सीकडून विमानाची तपासणी सुरू आहे.
मंगळवारी पहाटे 5 वाजता हे विमान सर्व प्रवाशांना घेऊन न्यू-यॉर्कला रवाना होईल, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दरम्यान, या चिट्ठीबाबतही तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List