सायबर बुलिंगच्या पीडितांसाठी नवीन हेल्पलाइन, संपर्क साधा अन् वेळीच कायदेशीर मदत मिळवा
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. चुटकीसरशी कोणीही सायबर बुलिंग आणि सेक्सटॉर्शने बळी पडत आहेत. अशा पीडितांना नेमके करायचे काय, संपर्क कुठे साधायचा, कायदेशीर मदत कशी मिळवायची, असे प्रश्न पडतात. अशा पीडितांसाठी महाराष्ट्र सायबर पोलीस आणि ब्रश ऑफ होप यांच्या संयुक्त विद्यमाने एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
सायबर बुलिंग आणि सेक्सटॉर्शनचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असून सायबर भामट्यांच्या जाळ्यात नागरिक अलगद सापडत आहेत. यांची गंभीर दखल घेत ‘ब्रश ऑफ होप’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या वतीने हेल्पलाइन सुरू केली आहे. पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अपर पोलीस महासंचालक यशस्वी यादव, अभिनेता फरहान अख्तर, माजी एसीपी नीता फडके, शालिनी जाटिया आदी मान्यवरांच्या हस्ते ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली.
काय मदत मिळणार
सायबर बुलिंग अथवा सेक्सटॉर्शन झाल्यास पीडितांनी घाबरून न जाता लगेच 022-65636666 या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास संबंधितांचे समुपदेशन करण्यात येईल. शिवाय त्यांना कायदेशीर मदत पुरवली जाईल. यामुळे संबंधितांवरील मानसिक ताण मोठय़ा प्रमाणात कमी होईल आणि ते कुठलाही चुकीचा विचार करणार नाही. आठवडय़ातून सहा दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 8 या वेळेत ही हेल्पलाइन खुली राहील, असे डॉ. शीतल गगराणी यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List