दऱ्याखोऱ्यांत उतरून महिला पोलीस करणार बचाव कार्य, 43 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले रॅपलिंगचे प्रशिक्षण

दऱ्याखोऱ्यांत उतरून महिला पोलीस करणार बचाव कार्य, 43 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले रॅपलिंगचे प्रशिक्षण

रायगड जिल्ह्यातील डोंगराळ भागात जर एखादी दुर्घटना घडली किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर ४३ पोलीस हिरकणी दऱ्याखोऱ्यात उतरून बचाव कार्य करणार आहेत. रायगड पोलीस दलातील या हिरकणींना रॅपलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे घाटात अपघात होऊन गाडी दरीत कोसळल्यानंतर या महिला पोलिसांना ट्रेकर्स किंवा बचाव पदकाची वाट न पाहता स्वतः बचाव कार्य करता येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान या महिला पोलीस १२० फूट उंचीचा डोंगर उतरून गेल्या आहेत.

रायगड पोलीस आणि यशवंती हायकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने झेनिथ वॉटर फॉलच्या डोंगरावर रॅपलिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरात पेण, अलिबाग, कर्जतसह रायगड जिल्ह्यातील ४३ महिला पोलीस सहभागी झाल्या होत्या. खोपोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण रॅपलिंग करत शिबिराचे उद्घाटन केले. माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनीही रॅपलिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर सर्वच महिला पोलिसांनी हिमतीने आणि न घाबरता १२० फूट उंचीचा डोंगर उतरून आम्ही हिरकणी असल्याचे दाखवून दिले. या महिला पोलिसांनी रॅपलिंगचे प्रशिक्षण घेतल्यामुळे डोंगरदऱ्यात अडकलेल्या जखमींना वाचवण्यासाठी त्यांना ट्रेकर्स किंवा अन्य बचाव पथकाची वाट पाहवी लागणार नाही. त्यांना दऱ्यांमध्ये उतरून जखमींना किंवा अडकलेल्या नागरिकांना मदत करता येणार आहे. या प्रशिक्षणप्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत आदी उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॅपलिंगचा अनुभव घेतला.

रायगड जिल्ह्यात तळये, इर्शालवाडीवर मोठी नैसर्गिक अपत्ती कोसळली आणि मोठ्या दुर्घटना घडल्या. सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे बस पुरात वाहून गेली आणि अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. अशा अपत्तीमध्ये बचाव कार्य करण्यासाठी महिला पोलिसांना हे रॅपलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा...
Maharashtra Budget: छावा चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पोहचला, आता अर्थसंकल्पात महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा
अर्थसंकल्प 2025 : अजितदादांच्या 15 घोषणा काय आहेत पहा ?
Maharashtra Budget: लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार…
Maharashtra Budget: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होणार? अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा
Maharashtra Budget: अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लाडक्या बहिणी अन् पुन्हा आलो, पुन्हा आलो…
माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा…अमिताभ यांचे प्रॉपर्टीविषयी वक्तव्य; कोट्यवधींची संपत्ती नेमकी कोणाला मिळणार?