बोगस रेरा नोंदणीनंतर बनावट सातबारा, भूमिपुत्राची जमीन बळकावून चार टॉवर उभारले

बोगस रेरा नोंदणीनंतर बनावट सातबारा, भूमिपुत्राची जमीन बळकावून चार टॉवर उभारले

बोगस रेरा नोंदणी क्रमांक घेऊन कल्याण- डोंबिवलीत उभारलेल्या 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता बनावट सातबारा उतारा तयार करून भूमिपुत्राची जमीन बळकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. भूमाफिया आणि एका बिल्डरने या जमिनीवर चार टॉवर उभारून अटाळीतील भगत कुटुंबाला देशोधडीला लावले आहे. केडीएमसीचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने अशोक भगत यांनी कुटुंबीयांसह पालिका मुख्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

अशोक भगत यांची अटाळी येथे सर्व्हे नंबर 23 हिस्सा नंबर 4 येथे पिढीजात 25 गुंठे जमीन आहे. अधिकृत सातबाराही त्यांच्या नावावर आहे. मात्र 2012 विराट कन्स्ट्रक्शनचे बिल्डर परेश पारीख, आकाश पारीख, शिल्पा पारीख, प्रितेश पटेल, स्नेहा पटेल, पियुष पटेल यांनी आपल्या जमिनीवर बेकायदा कब्जा केल्याचा आरोप अशोक भगत यांनी केला आहे. वास्तुविशारद सतीश कानडे, पोलीस पाटील चंद्रकांत भगत आणि दलाल संदीप मुंढे यांनी राजकीय वरदहस्त आणि थेट पालिका अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून बोगस नोंदी घालून सातबारा तयार केला. त्यानंतर बिल्डरांनी या ठिकाणी विराट रेसिडेन्सी नावाने सात मजली चार इमारतींचे बांधकाम केले. घर खरेदीदारांची फसवणूक करून सदनिका विकल्या आहेत. बेकायदा इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी अशोक भगत यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

आकाचा काका कोण?
विराट कन्स्ट्रक्शनने भूमिपुत्र अशोक भगत यांची जमीन बळकावून अनधिकृत सात मजली चार इमारती उभारल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे 126 सदनिका आणि 30 दुकाने विकून बिल्डरने कोट्यवधींची माया जमवली आहे. यातून घरे खरेदी करणाऱ्या गरजूंचीही फसवणूक केली आहे. 2019 मध्ये उच्च न्यायालयाने सातबारा उताऱ्यामध्ये छेडछाड झाल्याचे निरीक्षण नोंदवताना या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन चार आठवड्यांत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिका आणि महसूल विभागाने बेकायदा बांधकाम करणाऱ्या आकावर काहीच कारवाई केली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Video: कथित गर्लफ्रेंडसोबत बसलेल्या युजवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयने विचारला प्रश्न, ती खुदकन हसली अन्… Video: कथित गर्लफ्रेंडसोबत बसलेल्या युजवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयने विचारला प्रश्न, ती खुदकन हसली अन्…
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने...
या औषधाने करण जोहरने 4 महिन्यांत 17 किलो वजन कमी केलं? करणने अखेर खुलासा केलाच
Rohit Sharma: लग्नाआधी 3 मुलींशी जोडलं गेलंय रोहितचं नाव, अफेअरनंतर मॅनेजरसोबतच…
“तर बाप म्हणून मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते…”; संजय दत्त असं का म्हणाला ?
Champions Trophy 2025 जिंकताच आणखी एका खेळाडूच्या घटस्फाटाची चर्चा, नाव जाणून व्हाल थक्क
IIFA 2025- जब वी मेट… करीना आणि शाहिद कपूरच्या ‘झप्पी’ची चर्चा, व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रियांचा महापूर
रमझानच्या पवित्र महिन्यात गुलमर्गमध्ये फॅशन शो, ओमर अब्दुल्ला भडकले