Crispy Pakoda Tips- क्रिस्पी कुरकुरीत भजी खायची आहेत ना, मग या टिप्स वापरून पाहा

Crispy Pakoda Tips-  क्रिस्पी कुरकुरीत भजी खायची आहेत ना, मग या टिप्स वापरून पाहा

सीझन कुठलाही असो, हातात एक गरमागरम चहाचा कप आणि संध्याकाळची वेळ… चहा किंवा काॅफीच्या कपासोबत भजी असल्यास, माहोल अधिकच रंगतदार होईल. हा रंगतदार माहोल करण्यासाठी भजीसुद्धा तितकीच कुरकुरीत असतील तर बातही कुछ और हैं.. अनेकजणी घरी भजी करताना, काही बेसिक चुका करतात. त्यामुळे भजी कुरकुरीत न होता ती नरम होते. नरम भजी खाण्यात खरोखर मजा नसते. अशावेळी क्रिस्पी भजी करण्यासाठी आपण छोट्या टिप्सचा अवलंब केला तर भजी नक्कीच क्रिस्पी होतील.

क्रिस्पी भजी करण्यासाठी बेसिक टिप्स

कोणत्याही पद्धतीची भजी असो, भजीचे पीठ तयार करताना बेसन पीठ घेतल्यास, त्यात किमान दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घालावे. त्यामुळे भजी कुरकुरीत होण्यास मदत होते.

 

कांदाभजी कुरकुरीत होण्यासाठी, कांदे पातळ कापावेत म्हणजे कांदा तेलात तळण्यासाठी फार वेळ लागणार नाही.

पिठात बेकिंग सोडा घालताना प्रमाण योग्य ठेवावे, म्हणजे भजीसाठी तेल जास्त लागणार नाही.

भजी तळण्यासाठी तेल खूप गरम अजिबात असता कामा नये. तर भजी करण्यासाठी तेल हे मध्यम गरम असावे. म्हणजे भजी कच्ची तळली जाणार नाहीत आणि मस्त खुसखुशीत होतील.

 

गरम तेलात थोडे मीठ टाकल्यास, भजी जास्त तेल शोषणार नाही. त्यामुळे नुसती तेलकट भजी होणार नाहीत.

 

 

भजीचे बॅटर करताना ते व्यवस्थित फेटून घ्यायला हवे, तर भजी मस्त कुरकुरीत होतील ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.

 

पालक, बटाटा, ओव्याची पाने, पालक पाने यांची भजी करताना पाने किंवा बटाटा धुवून झाल्यानंतर कोरडे करावे. त्यानंतर बॅटरमध्ये घालावे. भजी कुरकुरीत होण्यासाठी घेतलेल्या भाज्या कोरड्या करुन घ्याव्यात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार, अजितदादांची घोषणा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा...
Maharashtra Budget: छावा चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पोहचला, आता अर्थसंकल्पात महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा
अर्थसंकल्प 2025 : अजितदादांच्या 15 घोषणा काय आहेत पहा ?
Maharashtra Budget: लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार…
Maharashtra Budget: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होणार? अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा
Maharashtra Budget: अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लाडक्या बहिणी अन् पुन्हा आलो, पुन्हा आलो…
माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा…अमिताभ यांचे प्रॉपर्टीविषयी वक्तव्य; कोट्यवधींची संपत्ती नेमकी कोणाला मिळणार?