अभिनेत्री प्रियंका चोप्रा झळकणार एसएस राजामौलींच्या चित्रपटात, ‘या’ वर्षी प्रदर्शित होणार चित्रपट
बाहुबली आणि RRR च्या यशानंतर राजामौली आपल्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाले आहेत. हा एक खास चित्रपट असेल ज्याचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. चित्रपटाची कथा आफ्रिकेतील जंगलांवर रचण्यात आली असून त्यात भरपूर साहस असणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
6 वर्षांनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळणार
सध्या आणखी एक रोमांचक बातमी जी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ती म्हणजे या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत आहे. जर ही बातमी खरी ठरली तर प्रियंका 6 वर्षांनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळणार आहे. अर्थातच प्रियंकाचे चाहते या बातमीने खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट एप्रिल 2025 मध्ये फ्लोरवर जाण्याची शक्यता आहे. खरे तर राजामौली या चित्रपटासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्यांचा शोध प्रियांकावर संपला आहे.
दिग्दर्शक देसी गर्लला अनेकदा भेटला
पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘राजामौली यांनी आपल्या पुढच्या चित्रपटाची कथा जवळपास पूर्ण केली आहे. ते एप्रिल 2025 पासून सुरू करू शकतात. राजामौली जागतिक स्तरावरील मोठ्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यासाठी त्यांच्याकडे प्रियंका चोप्रापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. राजामौली आणि प्रियंका गेल्या 6 महिन्यांत अनेकदा भेटले आहेत. देसी गर्लला राजामौली यांच्या चित्रपटाची कल्पना आवडली असून तिने ती करण्यास होकारही दिला आहे.
महेश बाबू मुख्य अभिनेता असणार
प्रियंका चोप्रा ‘द स्काय इज पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर दिसला होता. प्रियंका चोप्रा पहिल्यांदाच महेश बाबूसोबत एखाद्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. या चित्रपटात प्रियंका दमदार अॅक्शन सीन्स करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तिने सध्या चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होईल.
भारत आणि अमेरिकेतील स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यासोबतच आफ्रिकेतील जंगलातही या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन देखील या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रियांका चोप्रा ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List