अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू! तालिबान सैन्याचे पाकच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. संघर्षात वाढ झाल्यास प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तालिबान आर्मी आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सीमेवर चकमक उडाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानने प्रत्युत्तर दिले आहे. तालिबान आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चकमकीत 19 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून तीन नागरिकही ठार झाले आहेत. अफगाण मीडियाने शनिवारी ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील खोस्त आणि पक्तिया प्रांतांमध्ये ही चकमक झाली. तालिबान आर्मीने खोस्त प्रांतातील अली शिर जिल्ह्यात अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांना आग लावली आणि पक्तिया प्रांतातील दांड-ए-पाटन जिल्ह्यातील दोन पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या. स्थानिक माध्यमांनी एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, दांड-ए-पाटण जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांनी डागलेल्या मोर्टार शेल्समुळे तीन अफगाण नागरिक ठार झाले.
पाकिटिका प्रांतात मंगळवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही चकमक झाली. त्या हवाई हल्ल्यात 51 लोक मारले गेले. अफगाणिस्तानच्या भूमीतून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले केले जातात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आहे, त्यासाठी हे हवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढल्याचा आरोप पाकिस्तान सातत्याने करत आहे. त्यामुळे टीटीपीला बळ मिळाल्याचे पाकिस्तान सरकारचे मत आहे. टीटीपीला पाकिस्तानमध्ये इस्लामिक अमिरातीची स्थापना करायची आहे.
इस्लामाबादने काबुल सरकारवर सीमापार दहशतवादाचा आरोप केल्यानंतर अफगाण तालिबान आणि पाकिस्तान सरकारमधील संबंध अधिकच तणावपूर्ण बनले आहेत. तसेच आता अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचे प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही देशांतील संघर्ष विकोपाला गेल्यास युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List