धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडायला भाग पाडू, तोपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार – अंजली दमानिया
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 20 दिवस उलटले आहे. तरी अद्याप अन्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. यातच आज देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या आहेत की, ”धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडण्यास भाग पाडू, तोपर्यंत तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहोत.” दरम्यान, अंजली दमानिया या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. तसेच वाल्मिक कराडला अटक झालीच पाहिजे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्या सारखे मंत्री नको. राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील, तर असे मंत्री आम्हाला नकोaयांच्या सारख्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास आम्ही भाग पाडू.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List