एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलिसांकडून 12 तासांत सुखरूप सुटका

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलिसांकडून 12 तासांत सुखरूप सुटका

तरुणाने अल्पवयीन मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण केल्यानंतर पुणे पोलिसांनी १२ तासांत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करीत मुलीची मुंबईतून सुटका केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री सव्वाआठच्या सुमारास धनकवडी भागात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धनकवडी भागात २६ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. १६ वर्षीय तरुणी तिच्या आईसोबत रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले. खिशातून बंदुकीसारखं काहीतरी मुलीच्या आईच्या डोक्याला लावले. मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून आरोपी फरार झाले.

हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असण्याची शक्यता आहे. आरोपी आणि तरुणी हे एकमेकांना ओळखतात. या आरोपींपैकी एका तरुणाचे संबंधित तरुणीवर प्रेम होते, असा संशय सध्या पोलिसांना आहे. आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीने संबंधित मुलीला मुंबईला घेऊन गेल्याची माहिती मिळताच, पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर आरोपी आणि संबंधित तरुणी हे खालापूर येथून पुण्याच्या दिशेने एका बसमधून येत आहेत, हे समजताच पोलिसांनी खालापूर गाठले. मुलीची सुटका केली. मात्र, तरुणाने पळ काढला. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणात यश कातूर्डे नावाचा तरुण आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू
चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील परलडका परिसरात शनिवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना...
छत्रपती शिवाजी महाराज की जय! लडाखमध्ये चीन सीमेवर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
अझरबैजान विमान दुर्घटना प्रकरणी व्लादिमीर पुतिन यांनी मागितली माफी, वाचा नेमकं काय म्हणाले…
कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी
‘प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही, निषेध म्हणून मीसुद्धा आता…’, सुरेश धस यांची घोषणा
अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?
नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले