गूगल मॅपने धोका दिला, कार थेट निर्माणाधीन रस्त्यावर पोहचली; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

गूगल मॅपने धोका दिला, कार थेट निर्माणाधीन रस्त्यावर पोहचली; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

हल्ली अचूक मार्ग शोधण्यासाठी सर्वजण गूगल मॅपची मदत घेतात. मात्र हेच गूगल मॅप कधी कधी संकटांना आमंत्रण देतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडली आहे. गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कार थेट निर्माणाधीन रस्त्यावर गेली आणि अपघात घडला. मात्र दैव बलवत्तर म्हणून दोघा तरुणांचा जीव वाचला आहे.

मथुरा-बरेली महामार्गावर ही घटना घडली. दोघे तरुण कारने प्रवास करत होते. यावेळी इच्छित स्थळी पोहचण्याचा अचूक रस्ता शोधण्यासाठी त्यांनी गूगल मॅपची मदत घेतली. गूगल मॅपच्या मदतीने ते कार चालवत जात होते. मात्र गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला.

गूगल मॅपने दाखवल्याप्रमाणे तरुण निर्माणाधीन रस्त्यावर कार घेऊन गेले. यामुळे कारला अपघात झाला. मात्र वेळीच कारमधील एअरबॅग्ज उघडल्याने तरुणांचा जीव वाचला आहे. मात्र तरुण यात जखमी झाले असून कारचेही नुकसान झाले आहे. स्थानिकांनी तात्काळ तरुणांना रुग्णालयात दाखल केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“बिपाशा-करणसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत भयंकर”; मिका सिंगचा खुलासा “बिपाशा-करणसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत भयंकर”; मिका सिंगचा खुलासा
गायक आणि संगीतकार मिका सिंग याने नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर यांच्यासोबत...
वयाने 15 वर्षांनी मोठ्या घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री?
गर्भपातानंतर अभिनेत्री रडली ढसाढसा; सासूने सावरलं, सुनेला पाहून सासरेही भावूक!
अक्षय कुमारने शेअर केला पत्नीचा भन्नाट व्हिडीओ; पाहून अर्जुन कपूर म्हणाला ‘टीना का तांडव’
दक्षिण कोरियामध्ये विमान अपघात नेमका कसा झाला? जाणून घ्या सविस्तर
सरकार आहे कुठे? नक्की कशात व्यस्त आहे? मुंबईतील प्रश्नांवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल
पंढरपूरजवळ भाविकांच्या बसचा भीषण अपघात, दोन जण ठार