अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर जखमी

अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर जखमी

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिच्या कारने दोन मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना कांदिवलीत घडली. शुक्रवारी रात्री कांदिवलीतील पोयसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात घडला. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

शुटिंगहून घरी परतत असताना उर्मिलाच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने दोन मजुरांना चिरडले. यात उर्मिला आणि तिचा चालकही जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर वेळीच एअर बॅग्ज उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातात कारचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List