“दबाव होता…” विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा; अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचं खरं कारण सांगितलं

“दबाव होता…” विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा; अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचं खरं कारण सांगितलं

अभिनेता विक्रांत मेस्सी हा त्याच्या अभिनयासाठी तसेच त्याच्या चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखला जातो. त्याचा चाहतावर्गही प्रचंड आहे. पण काही दिवसांपूर्वी तो चर्चेत आला होता तो त्याच्या अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयामुळे. एवढ्या कमी वयात आणि एवढ्या लवकर अभिनयातून ब्रेक घेण्याच्या त्याच्या निर्णयावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.

सोशल मीडियाचा दबाव 

विक्रांत मेस्सीने अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाची पोस्ट केल्यानंतर लगेचच दुसऱ्यादिवशी त्याने हा निर्णय मागे घेतल्याचेही पाहायला मिळाले. विक्रांतने त्याला आलेल्या धमकीमुळे त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत असल्याचे सांगत हा अभिनय सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

मात्र आता त्याने अशी पोस्ट का केली? याचं वेगळच कारण सांगितलं आहे. विक्रांतच्या व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले आहे. त्याने ब्रेक घेण्यामागे किंवा अशी पोस्ट करण्यामागे सोशल मीडियाचा दबाव असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पत्नी आणि मुलासोबत वेळ घालवू शकत नसल्याची खंत 

एका मुलाखतीदरम्यान विक्रांत मेस्सीने म्हटलं की, “ज्या आयुष्याचे मी नेहमी स्वप्न पाहिले होते, ते मला शेवटी मिळाले, म्हणून मला वाटले की आता ती जगण्याची वेळ आली आहे जसं मला हवं होतं.. मला ब्रेक घ्यायचा होता, कारण दिवसाच्या शेवटी, सर्वकाही क्षणिक आहे समजलं. म्हणूनच मी पुढील वर्षी फक्त एक चित्रपट करत आहे, जे मी सार्वजनिक जीवन जगत आहे, हे मला मान्य आहे सोशल मीडियावर येण्यासाठी पण जर कोणी मला पर्याय दिला तर, जेव्हा जेव्हा मला काहीतरी शेअर करावेसे वाटेल तेव्हा मी त्यावर नक्कीच शेअर करेन पण तेही अगदी निवडक असेल.” असं म्हणत विक्रांतने त्याची जी मनस्थिती झाली होती त्याबद्दल चर्चा केली आहे.

तसेच विक्रांतने हेही स्पष्ट केलं की, तो त्याच्या पत्नी आणि मुलासोबत वेळ घालवू शकत नाही, ज्यामुळे त्याला हा ब्रेक हवा होता. तो पुढे म्हणाला, ” माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हापासून मला त्याच्यासोबत किंवा माझ्या पत्नीसोबत कोणताही दर्जेदार वेळ घालवता आला नाही. हे सर्व एकाच वेळी घडत होते. त्यामुळेच मी त्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, एक अभिनेता म्हणून. , मुलगा, वडील आणि एक पती म्हणून माझ्यासाठी पुन्हा कॅलिब्रेट करण्याची वेळ आली आणि मी जे काही व्यावसायिकरित्या केले ते केल्यानंतर मला वाटले, ‘या देशात अभिनेता म्हणून मी आणखी काय करू शकतो? मला एक कलाकार म्हणून पुढेस

विक्रांतचे धमाकेदार आगामी चित्रपट 

जाण्याची इच्छा आहे.” असं म्हणत त्याने त्याच्या कुटुंबाबद्दलची जबाबदारी तसेच काम आणि कुटुंबामध्ये होणारी तडजोड याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूर यांचे फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न झाले. या वर्षी 7 फेब्रुवारीला त्यांच्या बाळाचा जन्म झाला. बाळासोबतचे फोटो विक्रांतने सोशल मीडियावरही शेअर केले होते.दरम्यान विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. धीरज सरना दिग्दर्शित, हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याशिवाय, त्याचे यार जिगरी आणि आँखों की गुस्ताखियाँ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News