अझरबैजान विमान दुर्घटना प्रकरणी व्लादिमीर पुतिन यांनी मागितली माफी, वाचा नेमकं काय म्हणाले…
कझाकिस्तान विमान दुर्घटनेप्रकरणी रशियाने आपली चूक मान्य केली आहे. याप्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी माफी मागितली आहे. या दु:खद घटनेबद्दल पुतिन यांनी दिलगिरी व्यक्त करत पीडितांच्या कुटुंबियांप्रती तीव्र शोक व्यक्त केला. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, अशी माहिती क्रेमलिनने दिली आहे.
अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानाने दक्षिण रशियातून उड्डाण केल्यानंतर कझाकिस्तानमधील अकताऊ शहराजवळ कोसळले. रशियन प्रदेशांवर युक्रेनियन ड्रोनकडून हल्ले सुरू होते.
त्याचवेळी हे विमान रशियाच्या हवाई हद्दीतून जात होते. युक्रेनियन ड्रोनवर प्रतिहल्ले करताना रशियाचे क्षेपणास्त्र विमानावर धडकले आणि हा अपघात झाला. विमानाने ग्रोझनी विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List