महावितरणकडे पैसे भरूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी

महावितरणकडे पैसे भरूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मागेल त्याला सोलार या योजनेसाठी महावितरणकडे पैसे भरूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठ्यासाठी मागेल त्याला सोलार पंप योजना सुरू करण्यात आली आहे. योजना चांगली आहे, मात्र, अंमलबजावणीमध्ये गोंधळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नवीन विहिरी, कूपनलिका खोदल्या आहेत. यासाठी मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत अनेकांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सोलार पंपासाठी अर्ज भरले होते. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस या योजनेची साइट बंद झाली होती. मागेल त्याला सोलर या महावितरण पोर्टलची साईट आता ओपन झाली आहे. त्यात सोलर पंपासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचा पर्याय आहे. मात्र, पुरवठादार निवडण्याचा कोणताही पर्याय येत नसल्याने शेतकरी मात्र संभ्रमात आहेत. सोलरसाठी पैसे भरावेत की नाही, या द्विधा मनःस्थितीत अनेक शेतकरी आहेत. तर ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना दोन महिन्यांपासून पुरवठादार निवडण्याचा पर्याय येत नसल्याने ते शेतकरी इकडे आड अन् तिकडे विहीर अशा अडचणीत सापडले आहेत.

पैसे भरल्यानंतर सोलारची कंपनी निवडता येत नाही, तसा पर्यायही नाही, तर दुसरीकडे नव्या शासनाचा कंपनीशी करारही झालेला नाही. यामुळे पैसे भरूनही शेतकऱ्यांना सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पैसे भरल्यानंतर सोलार पंप कधी मिळेल, याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही. महावितरणचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

महावितरणकडे भरलेले पैसे पडून

मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी माझी दोन महिन्यांपूर्वी निवड झाली होती. मी तत्काळ पैसे भरले. आता दोन महिने झाले तरीही कंपनी निवडण्याचा पर्याय येत नसल्याने महावितरणकडे पैसे भरूनही सोलर पंप कधी येईल, याची वाट पहावी लागत आहे, असे वडीगोद्री येथील शेतकरी अभिजित काळे यांनी सांगितले. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाणी असूनही सौरपंप नसल्यामुळे अडचण येत आहे. तर याबाबत महावितरण विभागाचा कुठलाही अधिकारी माहिती देण्यास तयार नाही. महावितरणने तत्काळ सोलार योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू
चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील परलडका परिसरात शनिवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना...
छत्रपती शिवाजी महाराज की जय! लडाखमध्ये चीन सीमेवर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
अझरबैजान विमान दुर्घटना प्रकरणी व्लादिमीर पुतिन यांनी मागितली माफी, वाचा नेमकं काय म्हणाले…
कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी
‘प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही, निषेध म्हणून मीसुद्धा आता…’, सुरेश धस यांची घोषणा
अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?
नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले