ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणात आली आहेत, त्यांना अटक करा; मनोज जरांगे यांची मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या विराट सर्वपक्षीय मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. तसेच त्यांना बीडचे पालकमंत्रीपद सुद्धा देऊ नये, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली. ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणात आली आहेत, त्यांना अटक करा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले की, या प्रकरणी कारवाई झाली नाहीन केल्यास दंडूक हाती घ्यावं लागेल, असा इशारा दिला. जरांगे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे नेत्यांना विनंती आहे तुम्हीच मुख्यमंत्रीकडे जा. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा. जेवढी नावं तुम्ही सांगाल तेवढी अटक करा. ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणात आली आहेत, त्यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.
आमची भाषणे याआधीही झाली आणि होतीलय मात्र, संतोष देशमुख यांच्या मुलीचं तोंड एकदा बघा. तुमचा नेता आमचा दुष्मन नाही. आरोपी सापडणे मोठी गोष्ट नाही, आमच्या मुलांनी कमेंट केली तर अटक केली, पण खुनाचे आरोपी तुम्हाला सापडत नाहीत संतोष देशमुख यांची हत्या झाली. परभणीत झालं, धाराशिवमध्ये असच प्रकार घडला आहे. काही मंत्र्यांना राज्यात विध्वंस घडवायचा आहे, मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. प्रत्येकाला अटक करा, असे जरांगे म्हणाले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अजूनही अटक झाली नाहीये. आता आपल्याला या कुटुंबाच्या पाठी राहावं लागेल. आपला जिल्हा सोडायचा नाही. मागे हटू नका. ते आणखी हल्ले करतील. आता वाट पाहायची नाही. आता जशाला तसं उत्तर द्यायचं. बघू किती दिवसांमध्ये आरोपींना अटक होते. आपण आता पाणीच पाजायचं त्यांना. आपण जे बोलतो तेच करतो, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणात आली आहेत, त्यांना अटक करा. मी या लेकराचं तोंड पाहू शकत नाही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं काही मोठी गोष्ट नाही. आमचं एक पोरगं मुंबईत आठ महिने होतं. एक कमेंट टाकली होती. अन् तुम्हाला खून केलेला आरोपी सापडत नाही. 154 च्या नोटीशीतील पोरंही आत गेले. तुम्हाला खूनाचा आरोपी सापडत नाही. सरकार गोरगरीबांना न्याय देणार की नाही. उरण, परभणी, धाराशीव, अंबड, अनेक ठिकाणी गुन्हे घडत आहे. पण आरोपी मोकाट आहेत, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List