सलमान खानच्या भावासोबत पदार्पण करणारी ही अभिनेत्री आता काय करते ?

सलमान खानच्या भावासोबत पदार्पण करणारी ही अभिनेत्री आता काय करते ?

चित्रपट जगतात असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना अनेक चित्रपटात काम करूनही फारसं यश मिळालं नाही. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री समीरा रेड्डी. पदार्पण केल्यानंतर सुरूवातीच्या काळात तिने अनक चांगल्या चित्रपटांत काम केलं, त्यातले थोडेफार यशस्वी देखील ठरले. पण बरेचसे फ्लॉप झाले. समीराने फक्त हिंदीतच नव्हे तर साऊथच्या चित्रपटांतही काम केलंय.बऱ्या काळापासून ती फिल्मी दुनियेपासून दूर आहे.

‘और आहिस्ता कीजिए बातें’ हे पंकज उधास यांचं गाणं सर्वांनाच माहीत असेल, अनेकांचं ते आवडतं होतं.याच गाण्यातून करिअरल सुरूवात करणाऱ्या समीरा रेड्डीचा आज , अर्थात 14 डिसेंबरला वाढदिवस असतो. 1997 साली पंकज उधास यांनी गायलेल्या गाण्याच्या व्हिडीओत झळकल्यानंतर समीराचं नशीब पूर्णपणे बदललं. गाण्यातील हा व्हिडीओ आणि समीराचं त्यातलं काम लोकांना खूप आवडलं. आणि ते पाहूनच तिला एकामागोमाग चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. 2002 मध्ये तिने चित्रपटांत पदार्पण केलं. अभिनेता सलमान खान याचा भाऊ सोहेल खान याच्यासोबत ती चित्रपटात झळकली.

फिल्मी करीअर खास नाही

समीरा रेड्डी आणि सोहेल खान स्टारर ‘मैंने दिल तुझको दिया’ हा पिक्चर चित्रपटगृहात फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर तिने सैफ अली खान, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत ‘डरना मना है’ हा हॉरर चित्रपट केला, पण हा चित्रपटही काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर समीरा ही संजय दत्त, प्रियांका चोप्रासोबत ‘प्लॅन’, अनिल कपूरसोबत ‘मुसाफिर’, ‘फुल अँड फायनल’, ‘नक्षा’, ‘वन टू थ्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मात्र एकही चित्रपट हिट ठरला नाही

2013मध्ये शेवटचा चित्रपट

मात्र याच चित्रपटांसोबत तिने ‘नो एंट्री’ आणि ‘रेस’ अशा चित्रपटांतही काम केलं, जे यशस्वी ठरले. पण त्याचं फारसं श्रेय तिला मिळालं नाही, ना तिला फारसा त्याचा फायदा मिळाला. समीराने बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट केले, पण तिच्या एकाही चित्रपटाने विशेष कामगिरी केली नाही. 2013 मध्ये तिने ‘वरदनायक’ हा कन्नड चित्रपट केला, जो तिचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर पुढच्याच वर्षी तिने उद्योगपती अक्षय वर्देसोबत लग्न केले.

समीरा आणि अक्षय लग्नापूर्वी जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट करत होते. सध्या समीरा फिल्मी जगापासून दूर असते. अक्षय आणि समीराला हंस आणि नायरा ही दोन मुले आहेत. अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच ॲक्टिव्ह असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List