महत्त्वाचे: मणिपुरात हिंसाचाराच्या घटना सुरूच

महत्त्वाचे: मणिपुरात हिंसाचाराच्या घटना सुरूच

मणिपुरात सातत्याने घडत असलेल्या गोळीबाराच्या घटनांवरून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी कुकी अतिरेक्यांनी शांतता व सौहार्द यावर हल्ला केला असल्याचे म्हटले. कुकी आणि मैतई समाजातील संघर्षामुळे मणिपुरात सलग पाचव्या दिवशी गोळीबाराची घटना घडली. शनिवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एक स्थानिक पत्रकार आणि शुक्रवारी एक महिला जखमी झाली. ‘‘निरपराधांवर होत असलेला भ्याड हल्ला म्हणजे मणिपूरच्या शांतता आणि सौहार्दावर हल्ला आहे. मी गोळीबाराच्या घटनेचा तीव्र निषेध करतो. या घटनेत नागरिक आणि सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत,’’ असे मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून म्हटले आहे.

‘आप’ची महिला सन्मान योजना; एलजींनी दिले तपासाचे आदेश

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाची महत्त्वाकांक्षी महिला सन्मान योजना वादाच्या भोवऱयात सापडली असून एलजींनी तपासाचे आदेश दिले आहेत. आपकडून या योजनेसाठी महिलांची नोंदणी सुरू असताना त्यांच्याच सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचे म्हटले. दिल्ली प्रशासनाने यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करून अशी कोणतीही योजना नसल्याचे जाहीर केले. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे एलजी व्ही. के. सक्सेना यांच्या प्रधान सचिवांनी दिल्लीचे मुख्य सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना महिला सन्मान योजनेबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले असून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यावर अत्याचार; शिक्षिकेला अटक

पुणे : दहावीतील विद्यार्थ्यांवर शिक्षिकेने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळेत उघडकीस आली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा एका शाळेत दहावीत आहे. शिक्षिकेने त्याच्याशी प्रेमसंबध जुळविले. शुक्रवारी तो शाळेत दहावीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी आला होता. मुलगा शाळेत आल्यानंतर त्याच्या पालकत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रवि किशन दुधाने आंघोळ करायचे; अजूनही होती एक विचित्र सवय, वैतागून अनुराग कश्यपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून बाहेरचा रस्ता दाखवला रवि किशन दुधाने आंघोळ करायचे; अजूनही होती एक विचित्र सवय, वैतागून अनुराग कश्यपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून बाहेरचा रस्ता दाखवला
अनुराग कश्यपची आयकॉनिक फिल्म ‘गैंग्स ऑफ वासेपुर’मध्ये अभिनेता आणि राजकारणी असलेले रवि किशन हे देखील भूमिका करणार होते. मात्र ऐनवेळी...
सलमान खान आणि संगिता बिजलानी याचं लग्न ठरलं होतं, कार्डही छापली होती, पण…
प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूनं खळबळ, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, चित्रपट सृष्टीवर शोककळा
प्राजक्ता माळी प्रकरणात शिवसेनेनं पहिल्यांदाच भूमिका केली स्पष्ट, सुरेश धस यांना सल्ला काय?
आता ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि.’, धारावी पुनर्विकास कंपनीला मिळाली नवी ओळख
“हो मी पॅरालायज्ड झालेय? आता जगू द्या आम्हाला”; आलियाचा संताप, मनातील सगळा राग काढला
‘मी गौतमीला कधी कलाकार मानलंच नाही, गौतमी आणि प्राजक्ताची तुलना…’, दिपाली सय्यद काय म्हणाल्या?