सावकारी व्याज वसूल करण्यासाठी विशाल गवळी करायचा महिलांचे शोषण

सावकारी व्याज वसूल करण्यासाठी विशाल गवळी करायचा महिलांचे शोषण

कल्याणमधील निष्पाप 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीचे अनेक कारनामे किळसवाणे आणि अंगावर शहारे आणणारे आहेत. बेकायदा सावकारी कर्जातून त्याने बक्कळ पैसा मिळवला आहे. थकलेले पठाणी व्याज वसूल करण्यासाठी महिलांचे लैंगिक शोषण करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. या हैवानाच्या छळछावणीला बळी पडलेल्या अनेक महिला आता पोलिसांत तक्रार देण्यासाठी धाडसाने पुढे येत आहेत. दरम्यान आरोपी विशाल आणि साक्षी या पती-पत्नीला तपासासाठी मानपाडा पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले आहे.

नराधम विशाल गवळीच्या गुन्ह्याचे स्वरूप आणि तपासाची आवश्यकता पाहता कोर्टाने त्याच्यासह पत्नीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अल्पवयीन मुलीच्या निघृण हत्येनंतर कल्याण डोंबिवली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कल्याण पूर्वेत तर या हैवानाविरोधात दोन दिवसांत तीन मोर्चे निघाले. गवळीविरोधात प्रचंड जनक्षोभ असल्याने त्याला कोळसेवाडी पोलीस कस्टडीत ठेवण्याऐवजी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात नराधम विशालचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्याच्या मन सुन्न करणाऱ्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत

बापरे… महिना 50 टक्के व्याज

गवळीचे वडील सावकारी व्याजाने पैसे देत असल्याची माहिती पुढे आली आहे. विशाल गवळीकडे वसुलीची जबाबदारी आहे. घराची, गाडीची कागदपत्रे गहाण ठेवून 10 ते 50 टक्के महिना व्याजाने कर्ज दिले जाते. कोळसेवाडी, चक्की नाका, नंदादीप परिसरात अनेक छोटे व्यावसायिक, फेरीवाले, चाळ, झोपडपट्टीतील गरीब – मध्यमवर्गीय, नोकरदार गरजू कुटुंबे पठाणी व्याजाच्या विळख्यात अडकली आहेत. नागरिकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन विशालने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. एक दिवस जरी व्याज थकले तर लिंगपिसाट विशाल महिलांचे लैंगिक शोषण करायचा. त्याच्या या विकृतीला अनेक महिला बळी पडल्या आहेत.

दहशतीमुळे अनेक कुटुंबे परागंदा

विशाल गवळीने मुली, महिलांसोबत लहान मुलांनाही आपली शिकार बनवले होते. त्याच्या घराजवळ एक कुटुंब चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायचे. वर्षभरापूर्वी विशालने या कुटुंबातील एका चिमुकल्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या धक्क्याने पीडित मुलाचे कुटुंब व्यवसाय बंद करून कल्याण सोडून परागंदा झाले. नराधम विशालच्या दहशतीमुळे अशी अनेक कुटुंबे कल्याण पूर्वेतून घरे विकून बाहेर गेली आहेत.

माजी आमदार कोण?

बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, चिमुकल्यांचे लैंगिक शोषण, छेडछाड, मारहाण, जबरी चोरी अशा वेगवेगळ्या प्रकरणांत नराधम विशाल गवळीवर गुन्हे दाखल आहेत. एका माजी आमदाराचा हात गवळीच्या डोक्यावर होता. त्यामुळेच आतापर्यंत त्याच्या गुन्हेगारी कारनाम्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले.

इतके होऊनही पोलीस गप्प कसे?

विशाल गवळीवर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल आहेत. मात्र प्रत्येक वेळी पोलिसांनी त्याला पाठीशी घातले. कधीच कठोर कारवाई केली नाही. किरकोळ कलमे लावल्यामुळे कायमच तो जामिनावर सुटायचा आणि बाहेर येऊन पुन्हा दहशत माजवायचा. त्यामुळे कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचीही चौकशी करण्याची मागणी कल्याणमधील विविध शिष्टमंडळांनी डीसीपी अतुल झेंडे आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आणखी एका पीडितेच्या आईने मांडली कर्मकहाणी

विकृत विशाल गवळीने चक्की नाका, नंदादीप परिसरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या वर्षी आणखी एका महाविद्यालयीन तरुणीला असाच भयानक त्रास भोगावा लागला होता. त्या पीडित तरुणीच्या आईने कुटुंबाला भोगाव्या लागलेल्या त्रासाची कर्मकहाणीच माध्यमांसमोर मांडली. 2023 मध्ये एका दिवशी तरुणी कॉलेजवरून घरी परतत असताना दिवसाढवळ्या भररस्त्यात विशाल गवळीने दारू ढोसून तरुणीसोबत जबरदस्ती केली होती. तिचे तोंड दाबून तिच्याशी अश्लील वर्तन केले होते. तरुणीने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेऊन घर गाठले होते. यानंतर कित्येक महिने पीडित तरुणी या धक्क्यातून बाहेर आली नव्हती. याप्रकरणी विकृत गवळीवर गुन्हाही दाखल झाला. मात्र नेहमीप्रमाणे तो जामिनावर सुटला. गवळीच्या विकृत कारनाम्यामुळे अनेक मुलींनी शाळा कॉलेज सोडून घरी बसने पसंद केले आहे. त्यांची शैक्षणिक कारकीर्द गवळीमुळे संपुष्टात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू
चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील परलडका परिसरात शनिवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना...
छत्रपती शिवाजी महाराज की जय! लडाखमध्ये चीन सीमेवर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
अझरबैजान विमान दुर्घटना प्रकरणी व्लादिमीर पुतिन यांनी मागितली माफी, वाचा नेमकं काय म्हणाले…
कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी
‘प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही, निषेध म्हणून मीसुद्धा आता…’, सुरेश धस यांची घोषणा
अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?
नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले