थर्टी फस्टचे पडघम वाजू लागले.. उल्हासनगरातील तळीरामांवर 800 पोलिसांचा वॉच

थर्टी फस्टचे पडघम वाजू लागले.. उल्हासनगरातील तळीरामांवर 800 पोलिसांचा वॉच

थर्टी फर्स्टचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत, पण जरा सावधान.. तर्र होऊन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवाल तर पोलीस कोणत्याही क्षणी नशा उतरवू शकतात. दारू पिऊन धागडधिंगा घातला तर तुमची वरात थेट पोलीस ठाण्यात निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे नशिले स्वागत करताना जरा काळजी घ्या. उल्हासनगर व परिसरातील अशा बेफिकीर तळीरामांवर 800 पोलिसांचा वॉच राहणार आहे. परिमंडळ क्षेत्रातील 29 स्पॉट निश्चित करण्यात आले असून सोमवार 30 डिसेंबरपासूनच पोलीस ‘इन अॅक्शन’ होणार आहेत.

उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रात उल्हासनगर 1, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी, हिललाइन, अंबरनाथ, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम असे आठ पोलीस ठाणे आहेत. या परिमंडळात कोणीही दारू पिऊन गाडी चालवणारे दिसल्यास ताबडतोब कारवाई केली जाणार आहे. ढाबे, हॉटेल्स, रिसॉर्ट्ससह सोसायट्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. याशिवाय उल्हासनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, बदलापूर या शहरांमधील चौक, नाके येथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

हे अधिकारी ऑन फिल्ड

अमोल कोळी (उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त), शैलेश काळे (अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त), विष्णू ताम्हाणे (उल्हासनगर), शंकर आवताडे (मध्यवतीं), अनिल पडवळ (विठ्ठलवाडी), अनिल जगताप (हिललाइन), बालाजी पांढरे (अंबरनाथ), रमेश पाटील (शिवाजीनगर), किरण बालवडकर (बदलापूर पूर्व), अनिल थोरवे (बदलापूर पश्चिम).

बंदोबस्तासाठी 109 अधिकारी, 628 कर्मचारी, एसआरपीची एक तुकडी, महिला पोलिसांचे पथक 24 तास तळीरामांवर करडी नजर ठेवणार आहे.
तळीरामांनी किती प्रमाणात दारू प्यायली आहे याची मोजणी ऑन द स्पॉट केली जाणार असून हे प्रमाण जास्त आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार

ठाण्यात चार महिन्यांत 200 मद्यपी आरटीओच्या जाळ्यात
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या चार महिन्यात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत दारू पिऊन वाहन चालवणारे 200 मद्यपी जाळ्यात सापडले. या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ही कारवाई अशीच चालू राहणार आहे. तळीराम वाहनचालकांना अद्दल घडावी यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाले आहे. त्यानुसार या विभागाने ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. ठाण्यासह भिवंडी, मीरा-भाईंदर शहरात वायुवेग पथक तैनात असणार आहेत. तसेच दुचाकी, कार, बस, ट्रक, मालवाहतूक वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू
चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील परलडका परिसरात शनिवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना...
छत्रपती शिवाजी महाराज की जय! लडाखमध्ये चीन सीमेवर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
अझरबैजान विमान दुर्घटना प्रकरणी व्लादिमीर पुतिन यांनी मागितली माफी, वाचा नेमकं काय म्हणाले…
कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी
‘प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही, निषेध म्हणून मीसुद्धा आता…’, सुरेश धस यांची घोषणा
अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?
नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले