मुंबई विमानतळावर इस्तंबुलला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा, आठ तासानंतर इंडिगोकडून उड्डाण रद्द
मुंबईहून इस्तंबुलला जाणारे प्रवासी शनिवारी विमानतळावरच अडकले. सुमारे आठ तास प्रवासी खोळंबल्यानंतर इंडिगोने इस्तंबुलला जाणारे उड्डाणच रद्द केले. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. इंडिगोने उड्डाण का रद्द केले याबाबत अद्याप खुलासा केला नाही. या विमानाने जवळपास 100 प्रवासी प्रवास करणार होते. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी आहेत.
काय घडलं नेमकं?
शनिवारी सकाळी 6.55 वाजता मुंबईहून इस्तंबुलला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे उड्डाण होणार होते. मात्र विमान 8.20 ला उड्डाण करेल असे प्रवाशांना सांगण्यात आले. यानंतर 9.30 वाजता विमानाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तिथेच थांबण्यास सांगितले. दीड तास बसल्यानंतर प्रवाशांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. यानंतर दुपारी 12.30 वाजता पुन्हा विमानात बसवण्यात आले.
एसीशिवाय प्रवाशांना दीड तास विमानात बसवल्यानंतर प्रवाशांना हे विमान रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरण आणि इंडिगोच्या व्यवस्थापनाकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांना विमान का रद्द केले याबाबत माहिती देण्यात आली नाही. प्रवाशांनी याबाबत इंडिगोच्या व्यवस्थापनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List