धक्कादायक! तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला जिवंत जाळले
तिसरीही मुलगी झाली म्हणून संतापलेल्या पतीने त्याच्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. परभणीतील गंगाखेड गावात 26 डिसेंबर रोजी घडली. यात 90 टक्के होरपळलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाचा सीसी़टीव्ही फुटेज समोर आले असून यात ती महिला स्वत:ला वाचविण्यासाठी पळत एका दुकानात शिरत असल्याचे दिसत आहे.
मैना कुंडलिक काळे असे त्या महिलेचे नाव आहे. मैना व कुंडलिक यांना तिन्ही मुली आहेत. तिसऱ्यांदाही मुलगी झाल्याने कुंडलिक मैनावर संतापलेला होता. त्यावरून त्यांचे सतत वाद होत होते. गुरुवारी मध्यरात्री कुंडलिकने मैनाच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. गंभीर जखमी अवस्थेत मैनाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मैनाची बहिण भाग्यश्री काळे हिने पोलिसात तक्रार दिल्यानंतर कुंडलिकला अटक करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List