विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा 16 तास खोळंबा
इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबईहून इस्तंबूलला जाणाऱया विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 16 तास खोळंबा झाला. 6 ई 17 हे विमान सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी टेक ऑफ घेणार होते, मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने नियोजित उड्डाणाला विलंब झाला. विशेष म्हणजे 10 तासांनंतर ते उड्डाण रद्द केल्याचे एअरलाईन्सने जाहीर केले आणि रात्री 11 वाजता पर्यायी विमानाची व्यवस्था केली. या गोंधळात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List