संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमधील मूक मोर्चातून आक्रोश; धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा, आंदोलकांची मागणी
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालवयावर धकडला. या मूक मोर्चातून सर्वपक्षीय नेत्यांनी आणि आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि वाल्मिक कराडला अटक करा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षेच्या मागणीसाठी बीडमध्ये मूक मोर्चात रस्त्यावर जनसागर उसळला. सर्वपक्षीय मूक मोर्चाला विराट स्वरूप आले. बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी झाले. या मोर्चात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. संतोष देशमुख त्याप्रकरणातील आरोपीला अटक करा, अशा घोषणा देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. सुभाष रोडवरून हा मोर्चा पुढे गेला. अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजीराज चौकापर्यंत हा विराट मोर्चा निघाला.
मोर्चात काळे झेंडे आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करणारे फलक या मोर्चात दिसून आले. मूक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. सुरेश धस, बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार, मेहबूब शेख या मोर्चामध्ये सहभागी झाले. यासोबतच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List