लाइव्ह शोमध्ये मित्राने सर्वांसमोर अभिनेत्रीचा कात्रीने ड्रेस कापला;सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल
‘इंडियाज गॉट लेटेंट ‘ हा शो सध्या फार चर्चेत आहे. कारण या शोमध्ये जगभरातून स्पर्धक आपली कला सादर करण्यासाठी येतात ज्यांमधील काही प्रसिद्धीझोतातही आलेले आहेत. कधी पूनम पांडे, कधी अविका गौर, भारती सिंह या शोमध्ये जज म्हणून खुर्चीवर बसल्या आहेत. या शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत आहेत. या शोमधील एक व्हिडीओ असाच व्हायरल झाला आहे ज्यामुळे त्या व्हिडीओमध्ये असणारी अभिनेत्री तथा मॉडेल चांगलीच ट्रोल झाली आहे.
या शोमध्ये एक अभिनेत्री आणि तिच्या मित्राने जे केलं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ही अभिनेत्री प्रंचड ट्रोल झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रियांका हलदर. लाइव्ह शोदरम्यान ती लाल रंगाचा ड्रेस घालून स्टेजवर आली.
स्टेजवरच तिच्या मित्राने या अभिनेत्राचा ड्रेस सर्वांसमोर कात्रीने कापला. स्टेजवर तिच्या मित्राने ज्या पद्धतीने ड्रेस कट करून आपले कौशल्य दाखवले ते पाहून केवळ जज नाही तर जनतेलाही आश्चर्य वाटलं . पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला की नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.
प्रसिद्धच्या नावाखाली हे असं कृत्य केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तिच्या मित्राने कलेच्या नावाखाली सर्वांसमोर तिच्या अशा ड्रेस फाडण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून तिने तिच्या नवऱ्याला फसवल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे.
प्रियांका हलदर कोण आहे?
प्रियांका हलदर प्रियांका हलदर ही 33 वर्षांची अभिनेत्री असून तिचा जन्म बंगालमध्ये झाला आहे. पण सध्या ती कामासाठी मुंबईत राहते. तसेच प्रियांका हलदरने क्राइम पेट्रोल, उठा पाटाक 4 (ALTT) आणि डीडी नॅशनल वरील काही कार्यक्रमांसह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय. इंस्टाग्रामवर प्रियांकाचे 14,500 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
प्रियांकाचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले असून लहान वयातच तिचं लग्न झालं आहे. तिने 18 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला, त्याच वय आता 15 वर्ष आहे. प्रियांकाचा नवरा भारतीय रेल्वेत काम करतो आणि तो सध्या नागपुरात राहतो. दरम्यान प्रियंका हलदरचे हे कृत्य शोचा एक मजेदार भाग असला तरी, सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List