रानडुक्कर, घोरपडीचं मांस अभिनेत्रीला पुरवलं कोणी? ‘सैराट’ फेम छाया कदमांच्या चौकशीची मागणी

रानडुक्कर, घोरपडीचं मांस अभिनेत्रीला पुरवलं कोणी? ‘सैराट’ फेम छाया कदमांच्या चौकशीची मागणी

वन्यजीवांची हत्या-शिकार करणे कायद्याने गुन्हा असताना आपण रानडुक्कर, घोरपड, साळिंदर आदी प्राण्यांचे मांस खाल्ल्याचे सांगणाऱ्या ‘सैराट’ फेम अभिनेत्री छाया कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना हे मांस पुरवले कोणी, याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मानद वन्य जीवरक्षक रोहन भाटे यांनी केली आहे.

भाटे यांनी याबाबत पश्चिम वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट यांच्याकडे तक्रार केली आहे. अभिनेत्री कदम यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

एका वृत्तवाहिनीने छाया कदम यांची घेतलेली मुलाखत शुक्रवारी (दि. 25) प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने उत्साहाच्या भरात आपण बरेच वन्यप्राणी खाल्ल्याचे म्हटले आहे.

‘मी कोणताही प्राणी खाते. मी रानडुक्कर, पिसोरी… हरणासारखा दिसतो तो, ससा, घोरपड, साळिंदर असे प्राणी खाल्ले आहेत’, अशा बढाया त्यांनी मारल्या. वर, तुम्ही म्हणाल ही बाई आहे की कोण आहे, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. आता त्या मुलाखतीत मिरवलेली ही प्रौढी अभिनेत्रीच्या चांगलीच अंगाशी आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश आहे का? Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश आहे का?
लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे, गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती, आता या...
अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा
Latur News – जुन्या वादातून तरुणाची हत्या, दोघांविरोधात गुन्हा दाखल
हे असं चालणार नाही… समज द्या नाहीतर कारवाई करू; फडणवीसांचा मिंध्यांना इशारा
“मेरे बॅग में बम है”… वाराणसीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अफवा, कॅनडाच्या नागरिकाला अटक
अभिनेत्याने चक्क स्वत:ची लघवी पिण्यास केली होती सुरुवात, काय होते कारण?
चालकाचे नियंत्रण सुटले अन् व्हॅन थेट विहिरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू